Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

नवीन लँड रोव्‍हर डिफेण्‍डर १५ ऑक्‍टोबर रोजी भारतात सादर होण्‍यास सज्‍ज

मुंबई: mh20live Network

जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने आज घोषणा केली की, प्रतिष्ठित नवीन लँड रोव्‍हर डिफेण्‍डर १५ ऑक्‍टोबर २०२० रोजी सायंकाळी ७.३० वाजता एका अनोख्‍या डिजिटल लाँच कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून भारतात सादर करण्‍यात येणार आहे. हा कार्यक्रम मीडिया सदस्‍य, लँड रोव्‍हर ग्राहक आणि ब्रॅण्‍डचे चाहते व उत्‍साहींसाठी असणार आहे.

जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया लि. (जेएलआरआयएल)चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्‍हणाले: ”आम्‍ही वर्ष २००९ मध्‍ये भारतामध्‍ये प्रवेश केल्‍यापासून देशात पहिल्‍यांदाच प्रतिष्ठित नवीन डिफेण्‍डर सादर करण्‍याचा लँड रोव्‍हरसाठी अभिमानास्‍पद क्षण असेल. तसेच जगभरात दिग्‍गज उपस्थितीचा आनंद घेतलेली वेईकल सादर होताना पाहणे, हा भारतातील ऑटो उद्योगक्षेत्रासाठी देखील लक्षणीय टप्‍पा असणार आहे. या वेईकलच्‍या दर्जाला अनुसरून भारतातील या वेईकलच्‍या आगमनासाठी आकर्षक व उच्‍च सर्वसमावेशक डिजिटल लाँच कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.”

नवीन डिफेण्‍डरसाठी बुकिंग्‍ज सुरू आहेत. अधिक माहिती ऑनलाइन www.landrover.inयेथे मिळू शकते.

ग्राहक लँड रोव्‍हरचे ऑनलाइन बुकिंग व्‍यासपीठ www.findmeasuv.inयेथे भेट देत त्‍यांच्‍या वेईकल्‍स बुक करू शकतात.

जग्वार लँड रोव्‍हर वाहने भारतात अहमदाबाद, औरंगाबाद, बेंगळुरू (२), भुवनेश्‍वर, चंदीगड, चेन्‍नई, कोइंम्बतूर, दिल्ली (२), गुरगाव, हैद्राबाद, इंदौर, जयपूर, कोलकाता, कोची, कर्नाल, लखनौ, लुधियाना, मंगलोर, मुंबई (२), नोएडा, पुणे, रायपूर, सुरत आणि विजयवाडा या२४ शहरांमधील २७ अधिकृत आउटलेट्समध्ये उपलब्ध आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close