Subscribe to our Newsletter
Loading
Uncategorized

कधी काही लिहिले नाही, मात्र साहित्यिकांच्या सहवासात घडलो


प्राचार्य प्रतापराव बोराडे यांची एमजीएमच्या सत्कार सोहळ्यात भावना


औरंगाबाद: मी साहित्यिक नाही किंवा मी कधी पत्नीलाही साधं पत्र लिहिले नाही. मात्र, पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज, ना.धा. महानोर यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांच्या सहवासात राहिलो आणि साहित्याशी याच अर्थाने माझा संबंध आला. ओसाड रानावरची जमीन ते दिमाखात उभी झालेल्या इमारतीपर्यंतच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रवासात मी होतो. मसापत असणं माझ्यासाठी आयुष्याभराचा आधार आहे. त्यामुळे मसापने जीवनगौरव पुरस्कार देऊन केलेला माझा हा सन्मान माझ्यासाठी मोलाचा आहे, अशी भावना प्राचार्य प्रतापराव बोराडे यांनी एमजीएममध्ये आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात व्यक्त केली.
मराठवाडा साहित्य परिषदेने प्रतापराव बोराडे यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला
आहे. या निमित्ताने एमजीएम विद्यापीठ तसेच वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या
वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती
अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, कुलसचिव प्रा. आशिष गाडेकर आणि बोराडे यांचे मित्र
भाऊ शिंदे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सत्काराच्या उत्तरात बोराडे म्हणाले, मी साधारणपणे
१९७५-७६ साली औरंगाबादेत आलो. तेव्हा माझ्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद (मसाप) हीच
आधारवड होती. अनंत भालेराव, बापू काळदाते, ना.धा.महानोर यांच्यासारख्या मान्यवरांचे सान्निध्य
सुरुवातीच्याच काळात लाभले. मला आणि महानोरांना मसापने आजीवन सदस्यत्व दिले आणि सोबत
भालेरावांनी माझ्यावर आणि महानोरांवर मसाप सांभळण्याची जबाबदारी टाकून दिली होती. मला
पुस्तके वाचण्याचे वेड आधीपासूनच होते. मात्र, मसापत आल्यानंतर ते वेड अधिकच वाढले.
मसापच्या इमारती बांधण्यात माझे काही योगदान नाही. पण, त्या उभ्या राहताना मी तिथे उभा
होतो, याचा मला कायम आनंद आहे. मी कधीच काही लिहिले नाही. कारण, मला लिहिताच येत
नाही. मात्र, शिक्षक असल्याने मी कितीही तास बोलू शकतो. त्यामुळे, मला मसापने जीवनगौरव
नेमका का दिला, याचा शोध घ्यायचाय, असा प्रेमळ चिमटाही बोराडे यांनी या वेळी काढला. या
जीवनगौरव पुरस्कारानंतर आता मला माझ्या आयुष्याचा बोनस अनुभवता येईल. मी आयुष्याचा
प्रचंड आनंद घेतलाय आणि यापुढेही आनंदातच राहायचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या

वेळी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, प्राचार्य प्रतापराव बोराडे हे साहित्यिकदृष्टी असलेले नेतृत्व
आहे. साहित्यिकांशी त्यांचा असलेला ऋणानुबंध कायमच प्रेरणादायी आहे. तर, आपल्या मित्राचा
जीवनगौरवाने सन्मान होणे, ही भावना प्रचंड आनंददायी असल्याचे भाऊ शिंदे या वेळी म्हणाले.
एमजीएमच्या प्रत्येक माणसांत, येथील प्रत्येक दगडांमध्ये बोराडे सरांविषयीची काही ना काहीतरी
अनुभव दडले आहेत. आसपासच्या जगाचा वेध घेत तितक्याच वेगाने परिवर्तन घडवणारे म्हणून
बोराडे सर कायमच प्रेरक ठरतात, अशी भावना कुलसचिव आशिष गाडेकर यांनी व्यक्त केली. या
वेळी प्रतापराव बोराडे यांच्याकडे शिकलेल्या तसेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेकांनी भावना
व्यक्त केल्या. डॉ. आशा देशपांडे यांनी सुत्रसंचलन केले. तर, डॉ. रेखा शेळके यांनी आभार मानले.

प्रतापराव हे एमजीएम विश्वाचे खरे जनक : अंकुशराव कदम
अध्यक्षीय भाषणात कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, जेएनईसीची सुरुवात झाली तेव्हा इमारतीपूर्वी
आम्ही प्राचार्याचा शोध सुरू केला होता. एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात कुणीही प्राचार्य
म्हणून यायला राजी नव्हते. आम्ही प्रतापरावांकडे गेलो तर त्यांनीही सुरुवातीला नकार दिला. मात्र,
आमच्या आग्रहामुळे अन्य प्राचार्याच्या नियुक्तीपर्यंत पद सांभाळण्यास राजी झाले. त्यांनी प्राचार्यपद
स्वीकारताच आम्ही मात्र अन्य प्राचार्याचा शोध थांबवून टाकला. जेएनईसी हे एमजीएमचे मदर
इन्स्टिट्यूट असून ते उभारण्यात आणि त्याचा नावलौकिक करण्यात प्रतापरावांचे योगदान
अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रतापराव हेच खऱ्या अर्थाने आजच्या एमजीएम विश्वाचे जनक आहे,
अशी भावनाही कदम यांनी व्यक्त केली.

अन् भाषणादरम्यानच ना.धों. महानोरांचा फोन आला
प्रतापराव बोराडे सत्काराच्या उत्तरात बोलताना ज्येष्ठ साहित्यिक ना.धा.महानोरांसोबतच्या त्यांच्या
मैत्रीविषयी, त्यांनी रंगवलेल्या अनेक कवितांच्या उत्तररात्रीपर्यंतच्या मैफलींविषयी तसेच अनेक
अनुभवांविषयी मनमोकळेपणाने बोलत होते. ना.धोंच्या या आठवणीत रममाण झाले असतानाच
नेमका त्यांना महानोरांचा फोन आला. प्रतापरावांनी भर सभागृहात या फोनचा उल्लेख करताच

उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. भर सभागृहात ज्यांच्यासोबतच्या क्षणांचा उल्लेख सुरू होता
त्याच व्यक्तीचा तिथे फोन येणे, हा एक अनोखा योगायोग होता.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close