Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

नेहरू युवा केंद्राकडून “करोना योद्धा युवक-युवतींचा, संस्थांचा” सन्मान

नेहरू युवा केंद्राकडून करोना योद्धा युवक-युवतींचा, संस्थांचा सन्मान

अलिबाग,जि.रायगड:-  नेहरू युवा केंद्र अलिबाग-रायगड यांच्यामार्फत करोना काळात पेण आणि महाड मध्ये जवळजवळ 50 हजार नागरिकांचे करोना स्क्रीनिंग करणारे स्वयंसेवक, शेकडो लोकांना अन्नधान्य मदत पोहचविण्याचे काम करणारे युवा, शासनाच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या उपक्रमात स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या ध्येयवेड्या करोना योध्यांना, युवक-युवतींना व संस्थांना  जिल्हा परिषदेच्या कै.प्रभाकर पाटील सभागृहात आयोजित “करोना योद्धा” सन्मान कार्यक्रमात काल (दि.23 जाने. रोजी) सन्मानित करण्यात आले.

     यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, महाराष्ट्र व गोवा राज्य नेहरू युवा संघटन राज्य संचालक श्री. प्रल्हाद सोनुने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  जयवंत गायकवाड, रायगड नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला या मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील 156 स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात आला.

      याप्रसंगी जिल्ह्यातील शेवटच्या नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी गाव पातळीवर सामाजिक भावनेने काम करणाऱ्या स्वयंसेवकांची फळी तयार व्हावी, त्यासाठी एक अधिकारी नाही तर माणूस म्हणून मी तुमच्यासोबत नेहमीच राहीन तसेच समाजाप्रती उत्तम आदर्शवत सेवा देण्याचे काम तुम्ही आम्ही सारे मिळून करू या, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

   शाश्वत स्वच्छता व पाण्यासाठी  सर्वांनी एक होऊन काम करू या, त्यासाठी तुमच्यासारख्या योध्या तरुणांची साथ जिल्हा प्रशासनाला मिळाली तर खरंच छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास असलेल्या रायगड जिल्ह्यात लोकोपयोगी आदर्शवत असे काम उभे राहील, असा विश्वास जयवंत गायकवाड यांनी व्यक्त केला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रूरल अँड यंग फाऊंडेशन चे सुशील साईकर यांनी केले तर आभार अलिबाग नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम अधिकारी श्री.संतोष फर्टियाल यांनी केले.

   या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाड मधील 25 हजार 500 लोकांच्या स्क्रिनिंग मध्ये सहभागी असणारे महाड येथील कै.काकासाहेब चितळे केंद्राचे संकेत सावंत, अलिबाग येथील सुप्रिया जेधे तसेच पेण येथील 28 हजार लोकांच्या स्क्रिनिंग मध्ये सहभागी असणाऱ्या अहिल्या मंडल या संस्थेच्या सौ.अश्विनी सुबोध गाडगीळ व हितवर्धिनी संस्थेच्या प्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close