Subscribe to our Newsletter
Loading
सामाजीक/विचार/सुविचार

समाजकार्य अविरत सुरु ठेवण्यासाठी पुरस्कार सोहळ्याची गरज-पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे


समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

श्रीरामपूर: सुरज सुर्यवंशी

समाजासाठी झटणाऱ्यांचा कार्यप्रकाश समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, त्यातुन अधिक कार्य करण्याची स्फूर्ती मिळते. तसेच कार्याचा वारसा पुढील पिढ्यांकडे हस्तांतरीत होऊन समाजोद्धाराचे कार्य अविरतपणे सुरु राहण्यास मदत मिळते.असे मत ज्येष्ठ विचारवंत ,सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे यांनी व्यक्त केले.
नागेबाबा उद्योगसमूहाच्या प्रेरणेने महाराजा प्रतिष्ठान व सोशल सर्व्हिस फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. कोल्हे बोलत होते. अध्यक्षस्थानी पं. महेश व्यास होते. तर पतसंस्था चळवळीतील सर्वश्री कडुभाऊ काळे, सुरेशराव वाबळे, शिवाजीराव कपाळे,डॉ. कुमार चोथानी,उद्योजक किशोर निर्मळ ,बबनराव तागड आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. कोल्हे यांनी समाज कार्याची आंबट कैरी खाता खाता दात आंबले पण तरीही राहवत नाही. असा समाजकार्य करणाऱ्या ध्येयावेड्यांचा स्वभाव असतो.मेळघाट हे आपले शक्तीस्थान असुन नव्या पिढ्याही येथे एकमेकांना समृद्ध करण्यासाठी झटत आहेत. असे सांगुन आपल्या सहभागातून मेळघाटातील बदललेली समाजव्यवस्था, जीवनपद्धती आणि सहजभावनेने होणाऱ्या व्यवहारांची माहिती देत मेळघाट ऐकण्या ऐवजी अनुभवायला येण्याचे आवाहन केले.
राज्य पतसंस्था चळवळीचे नेते काका कोयटे यांनी व्यासपीठावर बसलेले सर्व ध्येयवेड्यांच्या कार्यातून साक्षात देवाचे दर्शन झाल्याचा उल्लेख भाषणातून केला.
अध्यक्षीय भाषणातून पं. महेश व्यास म्हणाले की,जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृती ऋषितुल्य असुन देशात अनेक रत्नांची खान आहे.आपणाला त्याद्वारे संशोधकांची मोठी परंपरा लाभली आहे.समाजकार्य करणाऱ्यां भूमिपुत्रांना समाजापुढे प्रकट करण्याचे काम संयोजकांनी केले याबद्दल त्यांनी कौतुक केले.
यावेळी डॉ. कोल्हे व पं. व्यास यांच्या हस्ते
साहित्यिक क्षेत्रासाठी नामदेवराव देसाई, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. वसंत जमधडे, कला क्षेत्रासाठी चित्रकार भरतकुमार उदावंत, पत्रकारितेसाठी प्रा .ज्ञानेश गवले, कृषीक्षेत्रासाठी मंदाताई चव्हान, शिक्षण क्षेत्रासाठी बाळासाहेब रासकर, आर्थिक विभागासाठी काकासाहेब कोयटे, उद्योजकतेसाठी अविनाश कुदळे, क्रिडा क्षेत्रासाठी रभाजी वाघमारे, सामाजिक कार्यसाठी सुभाष वाघुंडे, अध्यात्मिक क्षेत्रासाठी निलकंठ तरकसे, संगित क्षेत्रासाठी विनय ढोले यांना स्मृतिचिन्ह व मेळघाटावर आधारित “मेळघाटातील मोहोर ,वैरागड तसेच विचारधन पुस्तके देऊन समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
तसेच कॉम्रेड जिवन सुरूडे, प्रसन्न धुमाळ, वसुधा बुगदे, डॉ. तौफिक शेख कोविड रक्षक योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संयोजक सुरज सुर्यवंशी यांनी स्वागत केले. रामपाल पांडे यांनी प्रास्ताविक भाषण केले. सूत्रसंचालन संतोष मते व सौ.गायत्री म्हस्के यांनी केले.शेवटी आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांनी आभार मानले.मिष्टान्न स्नेह भोजनाने सोहळ्याची सांगता झाली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close