औरंगाबाद : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सावंगी येथे शुक्रवारी (दि. 22) राष्ट्रध्वज स्वीकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काढलेल्या 33 फूट लांब तिरंगा रॅली व देशभक्तीपर घोषणांनी गावकऱ्यांचे लक्षवेधून घेतले.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा साजरा करण्यात येत आहे, ‘हर घर तिरंगा’ हे अभियान देखील राहण्याचा निश्चय सरकारने केला आहे. याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र भारताची अधिकृत पताका, देशाचा अभिमान राष्ट्रध्वज स्वीकार दिवस सावंगी येथे साजरा करण्यात आला. या उपक्रमात मातोश्री कलावती विद्यालय आणि किंग कमांडो अकादमीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 33 फूट भव्य तिरंगा रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय घोषणांनी परिसर दणाणून सोडला. गावकऱ्यांना रलीचे क्षण मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरला नाही. ग्रामपंचायत कार्यालयासमोर समारोप करण्यात आला.

राष्ट्रध्वजाची निर्मिती, रचना, इतिहास याविषयी राहुल जगदाळे यांनी उपस्थितांना माहिती दिली. फुलंब्री ठाण्याचे उपनिरीक्षक दामोधर वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्यासोबत हवालदार आनंद शिंदे आणि ज्ञानेश्वर चाटे उपस्थित होते. राजकीय भेद ना बाळगता गावातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, माझी सैनिक, पोलीस पाटील, तसेच सरपंच कदिर शेख व त्यांच्या पूर्ण ग्रामपंचायत टीमने सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजप्रती आदर व्यक्त केला. राष्ट्रध्वजास सलामी देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष समीर सय्यद, महिला आघाडीच्या बिस्मिल्ला सय्यद उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस अजय जगदाळे, अल्पसंख्य सेलचे तालुकाध्यक्ष शकील शेख, संजय म्हस्के यांनी केले होते.