Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

स्थानिक वस्तूंना मिळणार देशव्यापी बाजारपेठ :उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई: महाराष्ट्र शासनाचे लघु उद्योग महामंडळ तसेच खादी ग्रामोद्योग मंडळ व ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्ट यांच्यात सामंजस्य झाला. या करारामुळे राज्यातील स्थानिक कामगार विणकर, हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांनी तयार केलेल्या वस्तुंना देशव्यापी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

वाचा सविस्तर news भारत व जगासाठी अखेरच्या टप्प्यापर्यंत लसींसाठीची शीतगृहांची साखळी बळकट करण्याचे ‘गोदरेज अँड बॉइस’चे लक

या सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निलिमा केरकेटा, लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे व फ्लिपकार्टच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

वाचा सविस्तर news आरोग्यदायी तीळाचे फायदे काय आहे ,जाणुन घ्या…

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, या करारामुळे ग्रामीण भागातील कारागिर, विणकर, हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांतून तयार होणाऱ्या वस्तू तसेच पैठणी साड्या, लाकडी खेळणी, हाताने बनविलेल्या वस्तू, दागिने, कागदी वस्तू, पर्स तसेच हस्तकलेच्या इतर वस्तू फ्लिपकार्टद्वारे विकल्या जातील. या कराराद्वारे राज्यातील १२ कोटी जनतेपर्यंत जिल्ह्याजिल्ह्यात तयार होणाऱ्या विविध वस्तू पोहोचतील, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला

.वाचा सविस्तर newsजिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

विशेष म्हणजे फ्लिपकार्टने मराठी भाषेतून आपले संकेतस्थळ व ॲल्पिकेशन विकसित केले असून या निर्णयाचे श्री. देसाई यांनी स्वागत केले.

वाचा सविस्तर news भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण सामायिक प्रवेश परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याचे आवाहन

फ्लिपकार्टद्वारे ग्रामीण भागातून तयार होणाऱ्या वस्तुंचे पॅकेजिंग, ब्रँडींग करण्यासाठी कारागिरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच या वस्तुंची विनामूल्य फोटोग्राफी केली जाईल, असा विश्वास फ्लिपकार्टचे प्रमुख अधिकारी रजनीश कुमार यांनी व्यक्त केला.

वाचा सविस्तर news शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार

वाचा सविस्तर newsभारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण सामायिक प्रवेश परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याचे आव

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close