राष्ट्रीयत्व जागरुक करणारे साहित्य निर्माण व्हावेः डॉ.अशोक देशमाने

संभाजीनगरः भारत देशातील प्रत्येक सण-उत्सव आणि समारंभ हे विज्ञानाला अनुसरून आहेत. त्यात कुठेही अंधश्रद्धा अथवा कर्मकांडाचा किंचितही लवलेश नाही. मात्र, मागील काही शतकांपासून साहित्यनिर्मितीमध्ये इंग्रजाळलेले, डाव्या विचारणी असलेले अथवा मिशनऱ्यांचा सर्वाधिक वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रयीत्व आणि भारतीयत्वाची जाणीव करुण देणारे अधिकाधिक लेखक करण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. प्रभू श्रीराम असो अथवा हिंदु संस्कृतीशी संबंधित दर्जेदार आणि वास्तववादी लिखाण येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अशोक देशमाने यांनी केले. ते डॉ. हेडगेवार रुग्णालयातील दामूअण्णा दाते सभागृहात श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण समितीच्या वतीने आयोजित साहित्यिक परिसंवादात बोलत होते. यावेळी उपस्थित अनेक साहित्यिकांनी राममंदिराकरिता निधी समर्पणही केले.
डॉ. देशमाने म्हणाले, की भारतात विचारसरणी, खाद्यसंस्कृती आणि वातवावरणामध्ये प्रत्येक ठिकाणी भिन्नता आढळून येते. मात्र त्याचे पाळेमुळे इथल्या सनातन संस्कृतीमध्ये आढळून येतात. हिंदू धर्मातून जैन, बौद्ध, शिख यांसारखे धर्म कालांतरणारे थोड्या नव्या विचाराने उदयास आले. या धर्मात जातीय व धार्मिक भिंती उभ्या करून मतभेद निर्माण करण्याचे काम काही ठराविक साहित्यनिर्मितीमुळे झाले आहे. त्यामुळे संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हिंदु संस्कृतीचे अधःपतन होत आहे. त्याला खंडन करण्याची आता वेळ आलेली आहे. हे खंडण साहित्यातून केल्यास त्याचा सर्वदूर सकारात्मक परिणाम समाज घडण्यावर होऊ शकतो. प्रामुख्याने देशभक्ती, सामाजिक समरसता, राष्ट्रीय चेतना निर्माण करणारे साहित्य निर्माण होण्याची नितांत आवश्यकता आहे.
भारतात अनुसरलेल्या शिक्षणरचनेनुसार जपान, चीन आणि रशिया यांसारख्या देशांचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकविला जातो. पण भारताच्या इतिहासाकडे जाणुनबुजून दुर्लक्षित करण्यात आले. भारताच्या कित्येक राजांनी जगभरात दबदबा निर्माण केला होता. मात्र, त्यांचे कतृत्त्व या साहित्यिकांमुळे झाकोळले गेले. आपल्यासमोर ज्याप्रकारे इतिहास निर्माण केला जातो, त्याप्रमाणे समाज घडत जातो. भारतीय इतिहासात कुठेही बलात्कारासारख्या घटनांचे दाखले नाहीत. मात्र, आता या घटना मोठ्या संख्येने वाढताहेत. याला जबाबदार चित्रपट आणि त्यातून दिला जाणारा संदेश आहे. त्यामुळे येत्या काळात साहित्यिकांनी खारीचा का होईना वाटा उचलून योग्य इतिहासासह नव्या साहित्याची निर्मिती करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनकुमार रांजणीकर यांनी केले. आभार व सूत्रसंचालन हेमंत पोहनेरकर यांनी केले.
यावेळी डॉ. छाया महाजन, डॉ. दत्तात्रय येडले, प्रतिभा कुलथे-जोजारे, नागेश अंकुश, माया महाजन, पार्थ बावस्कर, सुधीर सेवेकर, श्रीकांत काशीकर, योगेश निकम, रसिका देशमुख, अतुल बेवाल, दोलन रॉय, निखिल राजे, जय घाटनांद्रेकर, गिरधर पांडे या साहित्यिकांसह डॉ.दिवाकर कुलकर्णी, संतोष पाठक, अतुल काळे, पंकज भारसाखळे, विशाल दरगड, अमित जालनावाला आणि पंकज पाडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.