Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ!

अहमदनगर | समाजातील एखादी विधवा महिला असेल तर तिच्याकडे पाहण्याची नजर ही तिरकीच असते. विधावा म्हटलं की समाजातील काही समाजकंटक संधीचीच वाट पाहत असतात. मात्र वडाळा बहिरोबा इथल्या एका विधवा महिलेच्या लहान दीराने सर्वांना आदर्श घालून दिला आहे.
आपल्या मोठ्या भावाची पत्नी म्हणजे वहिनी लग्नाचे सात फेरे घेऊन घरात आली. त्यानंतर घरात पाळणाही हलला. मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. काळाने घात केला आणि त्यांचा पती म्हणजे मोठा भाऊ महेश मोटे यांचा अपघाती मृत्यु झाला.
प्रांजली असं संबंधित महिलेचं नाव असून तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र त्यांचा लहान दीर महेंद्रने पुढे येत आपल्या वहिनीशी लग्न करण्याच निर्णय घेतला. दोघांच्या होकारानंतर घरातील सर्वांची सहमती घेऊन त्यांचा विवाह आज पार पडला.

दरम्यान, महेंद्र आणि त्याच्या घरच्यांनी समाजातील लोक, गावकरी, मित्र आणि पाहुणेमंडळी काय म्हणतील?, असा कोणताही विचार न करता त्यांनी विवाह करत समाजाला एक आदर्श घालून दिला आहे. महेंद्र आणि प्रांजली या दोघांना पाहुणेमंडळी, वऱ्हाडीमंडळींनी आशिर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close