Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरुवारी संध्याकाळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता लवकरच त्यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चर्चा सुरु होती. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही पद सोडण्याची तयारी जाहीररित्या बोलून दाखवली होती. दरम्यान, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? असा प्रश्न विचारला जात आहेदरम्यान, राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण राजीनामा दिल्याचं सांगितलं. तसंच आपल्याला अद्याप नव्या जबाबदारीबाबत कळवण्यात आलेली नाही. मला फक्त विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश हायकमांकडून आले होते. त्याचं मी पालन केलं, असं पटोले म्हणाले. नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close