Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

मान्सून केरळात दाखल

https://youtu.be/oi8yLk57Pbc?t=1
पुणे /प्रतिनिधी
हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. केरळच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. यंदाचा मान्सून पाऊस सरासरीच्या सामान्य राहिल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीचं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे कार्यकारी संचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी  दिलेल्या माहितीनुसार केरळच्या दक्षिण भागात मान्सून धडकला आहे. भारतीय हवामान विभागने यापूर्वी मान्सून केरळमध्ये १  जूनला दाखल होईल, असे म्हटले  होते. मात्र, त्यानंतर ३१  मे रोजी मान्सून दाखल होईल, असे  सांगण्यात आले. भारतीय हवामान विभागाने  पुन्हा नवीन माहिती देत 3 जूनला मान्सून दाखल होईल, असे सांगितले होते. त्यानुसार  मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी साधारणपणे मान्सून १  जूनला दाखल होतो, यंदा दोन दिवस उशिराने  केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने  मान्सून दक्षिण अरबी समूद्र, लक्षद्वीप, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन मालदिव भागात सक्रिय झाल्याचे सांगितले आहे.
    भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी वाऱ्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या १००  टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये मान्सून सरासरीच्या सामान्य राहणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ९६  टक्के ते १०४  टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटले जाते.भारतीय हवामान विभागनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात ९२ -१०८  टक्के होण्याची  शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर ९३ -१०७  टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात ९५  टक्के तर मध्य भारतात १०६ टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करणार आहे.
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close