Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्रशेतीविषयक

पैठण तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा हीच माझी भूमिका – ना.संदीपान भूमरे

पैठण / किरण काळे
पैठण तालुक्यातील दहा पैकी तीन मंडळातील शेतकऱ्यांनाच फळपीक विमा मंजुर झाला, हे खरे आहे. पण सगळ्यांनाच पीक विमा मिळाला पाहिजे अशीच माझी देखील भूमिका, या संदर्भात यापुर्वीच मी कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यांशी देखील या विषयावर बोलून ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा सगळ्याच शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी बोलतांना सांगितले.पैठण तालुक्यात मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील फळ उत्पादक शेतकऱ्यांनाच पीक विम्यापासून वंचित राहिल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.पीक विमा सगळ्यांना मिळावा हीच भूमिका मुख्यमंत्र्यांशी बोलणार.मंत्र्यांच्याच तालुक्यात शेतकऱ्यांना फळपीक विमा मंजुर होत नसेल तर मग दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या पार्श्वभूमीवर संदीपान भुमरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.भुमरे म्हणाले,तालुक्यातील दहा पैकी तीन मंडळातील शेतकऱ्यांनाच विमा कंपन्यांनी फळपीक विमा मंजुर केला हे खरे आहे.या संदर्भात मी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन संपुर्ण माहिती देखील घेतली आहे.अनेक भागात पाऊसच झाला नव्हता, त्यामुळे एका गावांतील शेतकऱ्यांना विमा मंजुर होतो, आणि त्याला लागून असलेल्या दुसऱ्या गावात तो नाकारला जातो हे चुकीचे आहे.पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.तीन मंडळात विमा कंपन्यांनी फळबाग विमा मंजुर केला आणि इतरांना नाकारला हे चुकीचे आहे. तालुक्यातील सगळ्याच मंडळातील शेतकऱ्यांना तो मिळाला पाहिजे अशीच माझी देखील इच्छा आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या या संदर्भात माझे बोलणे झाले आहे, त्यांनी देखील यातून मार्ग काढण्याचा शब्द दिला आहे. सध्या राज्यावर आणि देशावर कोरोनाचे संकट आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि फळांच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे. फळपीक विम्याच्या माध्यमातून त्यांना दिलासा मिळू शकतो. लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मी या संदर्भात विनंती करणार आहे. फळपीक विम्याचा प्रश्न लवकरच सुटेल, आणि नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना विमा मिळेल, असा विश्वास देखील संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close