Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

माझे कुटुंब माझी जबाबदारी कोकण भवनमध्ये कोरोना चाचणी

नवी मुंबई, :-कोरोना विषाणू (कोविड-19) संक्रमण व प्रादुर्भाव या अनुषंगाने कोकण भवन इमारतीत विभागीय महसूल आयुक्त कार्यालय आणि नवी मुंबई महानगरपालिका (आरोग्य विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने इमारतीतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी मोफत कोरोना विषयक (RT-PCR व Antigen) चाचणी करण्याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

        आज दि. 11 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वा. कोकण भवन येथील महिला भोजन कक्ष, दुसरा मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे, उपायुक्त (विकास) श्री.गिरीष भालेराव, उपायुक्त (करमणूक) श्रीम. सोनाली मुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, नायब तहसिलदार श्रीम. माधवी डोंगरे उपस्थित होत्या.

        दिवसभरात एकूण 138 एवढया चाचण्या करण्यात आल्या.  त्यापैकी 138 चाचण्या  निगेटिव्ह आल्या व एकही पॉझिटिव्ह चाचणी मिळाली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी पथक डॉ.तन्मय (BAMS) , डॉ.रत्नराज (BAMD/MD) यांनी यासाठी विशेष श्रम घेतले.  या शिबीरासाठी उपस्थित  महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या होत्या. या शिबीराच्यावेळी सोशल डिस्टनसिंगसह मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर करण्यात आला. 
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close