Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम केवळ शासनाची नाही तर लोकांची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याच्या ग्रामीण भागात  कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण

          मुंबई, दि. 29 : माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम सर्वांच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी असल्याने ही मोहीम केवळ शासकीय नसून लोकांची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

          राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत आरोग्य सर्वेक्षण झाले आहे. एकूण २४ लाख कुटुंबाना पथकांनी भेटी दिल्या असल्याचे ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेच्या जिल्हा परिषदामार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

          मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सारी व आयएलआय रुग्ण अधिक काटेकोरपणे शोधावे तसेच सर्व्हेक्षण पथकांचे अहवाल दररोज विस्तार अधिकारी व इतर वरिष्ठ यंत्रणांनी तपासावे. ही मोहीम केवळ शासन राबवीत नसून लोकांची आहे. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे यादृष्टीने जनजागृती करावी, मोहिमेत अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढवून ती अधिक परिणामकारक करावी, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

          जिल्हा परिषदांना १ कोटी ८४ लाख कुटुंबांना भेटीचे उद्दिष्ट दिले आहे पैकी २४ लाख कुटुंबाना भेटी झाल्या असून १३ टक्के उद्दिष्ट पार पडले आहे. यात सारी आणि आयएलआयच्या १५ हजार ३९२ रुग्ण तर कोविडचे ६ हजार ९३८ रुग्ण आढळले. सहव्याधी असलेले २ लाख ६ हजार २११ व्यक्ती आढळल्या.

          सर्वेक्षण झालेल्या लोकसंख्येत पुणे, नाशिक, कोल्हापूरमधून सर्वाधिक कोविड रुग्ण आढळले. ठाणे भागामधून २१ टक्के, नाशिक भागामधून १० टक्के, पुणे १८ टक्के, कोल्हापूर १५ टक्के, औरंगाबाद १२ टक्के, लातूर १३ टक्के, अकोला १३ टक्के आणि नागपूर भागामधून ६ टक्के इतक्या कुटुंबांचे सर्व्हेक्षण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली

          यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी देखील सुचना केल्या. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यावेळी उपस्थित होते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close