Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजनलाईफ स्टाईल

अभिनेत्री येशा रुघानी म्‍हणाली, ”मालिका ‘हिरो – गायब मोड ऑन’मधील माझ्या भूमिकेच्‍या माध्‍यमातून माझ्या बालपणीच्‍या काल्‍पनिक गोष्‍टी ख-या ठरत आहेत”

१.    मालिका हिरो – गायब मोड ऑनला होकार देण्‍यास कोणत्‍या गोष्‍टीने प्रवृत्त केले? सोनी सबशी संलग्‍न असल्‍यामुळे कसे वाटत आहे?

सुपरहिरो, साय-फाय मालिका ते फिल्‍म स्‍टार असलेली झाराच्‍या या विशिष्‍ट भूमिकेपर्यंत माझ्यासाठी ही मालिका अत्‍यंत रोमांचकारी होती. मी दुसरा विचार न करता मालिकेमध्‍ये काम करण्‍याला होकार दिला. माझ्या बालपणापासूनच मला सुपरहिरोंबाबत आणि फिल्‍म सेटच्‍या मागे घडणा-या गोष्‍टी जाणून घेण्‍याबाबत आवड राहिली आहे. मला आनंद होत आहे की मालिका ‘हिरो – गायब मोड ऑन’च्‍या माध्‍यमातून माझ्या बालपणीच्‍या काल्‍पनिक गोष्‍टी ख-या ठरत आहेत.

लोकांना आनंद व आशेची नित्‍यांत गरज असण्‍याच्‍या काळामध्‍ये सोनी सब परिवाराचा भाग असणे आणि भारतीय प्रेक्षकांसाठी परिपूर्ण मनोरंजन सादर करणे अत्‍यंत आनंददायी आहे.

२.    या मालिकेला खास बनवणारी बाब कोणती? हिरो – गायब मोड ऑनला इतर काल्‍पनिक मालिकांपेक्षा वरचढ ठरवणारी गोष्‍ट कोणती?

मालिकेचे प्रोमो सादर करण्‍यात आले तेव्‍हा प्रोमोच अगदी खात्रीदायी होते आणि त्‍यामधून मालिकेच्‍या भव्‍यतेची एक झलक पाहायला मिळाली. माझा दृढ विश्‍वास आहे की मालिका ‘हिरो – गायब मोड ऑन’ आणि तिचे लुक व भाव यांची निश्चितच चर्चा होईल, ज्‍यामुळे ही मालिका का वेगळी आहे, हे दिसून येईल. अत्‍याधुनिक व्हिज्‍युअल्‍स, एलियन्‍सचे अविश्‍वसनीय मेक-अप आणि लक्षवेधक व संबंधित पटकथा यामधून दिसून येते की मालिका प्रेक्षकांसाठी भारतीय टेलिव्हिजनवर यापूर्वी न दिसण्‍यात आलेल्‍या गोष्‍टी घेऊन येत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close