Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय,मराठा उमेदवारांना दिलासा

मुंबई/mh20live Network
 मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर ठाकरे सरकारने  एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेआहे.
   येत्या ११  तारखेला रविवारी महाराष्ट्रात २००  जागांसाठी एमपीएससी परीक्षा होणार होती. मात्र राज्यात  कोरोनाचे संकट आहे. गेले काही महिने अभ्यासिका, क्लासेस बंद होते. विद्यार्थ्यांच्या सूचना आल्या, अभ्यासाला वेळ मिळायला हवा. त्यामुळे ही परीक्षा काही काळ पुढे ढकलत आहोत, यापूर्वी दोनवेळा परीक्षा पुढे ढकलली होती. आता पुढे जी तारीख ठरवू त्याच तारखेला परीक्षा होईल. जे परीक्षार्थी ११  तारखेच्या परीक्षेला पात्र होते, ते सर्व पुढच्या तारखेला म्हणजे जी तारीख जाहीर होईल, त्या तारखेसाठी पात्र असतील, कोणाचेही वय वाया जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
येत्या ११ तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होईल.म्हणून या परीक्षा रद्द व्हाव्यात अशी मागणी मराठा आंदोलकांकडून होत होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close