Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

दीड लाखा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी केले ऑनलाईन श्री गुरु , सरस्वती मातृ-पितृृृ पूजन

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

कोरोना संकट दूर होण्यासाठी केली सामुदायिक प्रार्थना

— अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली यांचे आशीर्वाद व बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग प्रमुख आदरणीय श्री नितीनभाऊ यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत दिनांक 12 जुलै 2020 रोजी सकाळी 9 वाजता ऑनलाईन you Tube चॅनेल च्या माध्यमातून श्री गुरू-सरस्वती मातृ-पितृ पूजन सोहळा संपन्न झाला. घरच्या घरीच साजरा करण्यात आलेला हा उपक्रम संपूर्ण देशात व विदेशात एकाच वेळी साजरा करण्यात आला.
यावेळी बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग प्रमुख आदरणीय श्री नितीनभाऊ यांनी साधकांना या विभागातील केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती सांगितली . तसेच ते म्हणाले की अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग गेल्या दशकांपासून राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अविरत कार्यरत आहे. या विभागाच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थी व युवक यांच्या सहभागातून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात.

या विभागाचे समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा , व्यसनाधीनता,गुन्हेगारी,
बेरोजगारी अशा विविध सामाजिक प्रश्नांवर उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे.

या विभागा अंतर्गत युवा वर्गाच्या शैक्षणिक,सामाजिक,नोकरी-व्यवसाय यासारख्या प्रश्नांवर सर्वांगीण प्रबोधनात्मक मार्गदर्शन करून त्यांना विधायक दिशा दाखवण्याचे कार्य केले जाते.
या विभागाच्या माध्यमातून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून डोळस अध्यात्म रुजवले जाते. पर्यावरण रक्षण, दुर्ग संर्वधन, सामाजिक जबाबदारी व कर्त्यवे याबाबत जागरूकता करून सर्वांगीण विकास साधण्याचे प्रयत्न केले जातात.

आपली भारतीय संस्कृती मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव या सद्गुणांची शिकवण देणारी आहे. या उपक्रमातून दीड लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे माता- पिता व शिक्षकांचा आदर करा, माता-पित्यांचा सांभाळ करा असा सामाजिक संदेश दिला.

या स्तुत्य उपक्रमाची Kalam Book Of Worlds Records ने दखल घेतली असून बालसंस्कार विभागाचा हा सातवा विश्वविक्रम ठरला.

परमपूज्य गुरुमाऊली यांच्या संकल्पनेतील “वृद्धाश्रममुक्त भारत” या चळवळीकडे वाटचाल करणारा हा ऐतिहासिक उपक्रम ठरला.

दीड लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परिवारासमवेत उत्साहात श्री गुरुपूजन व सरस्वती पूजन करून लवकरात लवकर या covid 19 च्या गंभीर संकट दूर होण्यासाठी प्रार्थना केली.असल्याचे बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग प्रमुख आदरणीय श्री नितीनभाऊ यांनी सांगितले .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close