Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

गुटखा विरोधात मनसेचे निवेदन ; सहाय्यक आयुक्ताच्या टेबलवरच गुटख्याच्या पुड्या देऊन व्यक्त केला निषेध

कारवाई न केल्यास आंदोलनाचा  इशारा

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असूनही औरंगाबाद जिल्ह्यात सर्रासपणे व अवैधरीत्या गुटखा विक्री सुरु असल्याचे अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या निदर्शनास, एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणून दिले असून संबंधितावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्ताच्या टेबलवरच गुटख्याच्या पुड्या देऊन आपला निषेध व्यक्त केला.

प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदानात म्हटले आहे कि, औरंगाबाद जिल्ह्यात सर्रासपणे गुटखा विक्री होत आहे. परराज्यातून येणारा गुटखा तसेच तंबाखूजन्य साहित्य जिल्ह्यातील पान टपऱ्या, होलसेल टोब्याको विक्री करणारी दुकाने यासह विविध हातगाड्यांवर आढळून येत आहे. परिणामी शहरातील युवक, नागरिक सर्रासपणे हा गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाऊन शहरातील विविध ठिकाणे घाण करत आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणावर थुंकून येथील परिसर ते रंगवत असल्याने याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देऊन अन्न व औषधी प्रशासन विभागाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील, शहर सचिव संतोष कुटे, किशोर साळवे, विभाग अध्यक्ष चंदू नवपुते, कामगार सेनेचे सचिव बाबुराव जाधव, परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेश दीक्षित, महिला सेनेच्या रीना राठोड, मनीषा गवारे, विभाग अध्यक्ष विकी जाधव, अभय मांजरमकर, चित्रपट सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज गवई, प्रदीप पाटील यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद शहा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्ताच्या टेबलवरच गुटख्याच्या पुड्या देऊन आपला निषेध व्यक्त केला. यावर तातडीने कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे मनसेने दिला आहे. संलग्‍नके क्षेत्र

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close