Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादराजकीय

मुख्यमंत्री शहरात येण्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मनसेने 26 जानेवारीपर्यंत शिवसेनेला अल्टिमेटम दिले होते. मात्र औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाले नाही, म्हणून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावरून काल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी क्रांती चौक येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारला होता. त्यांनी खैरेंच्या अंगावर मागण्यांची पत्रकेही भिरकावली होती. . यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांची देखील गाडी अडवण्यात येईल’ असा इशारा दशरथे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.५) सकाळी सकाळीच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी शहरात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत स्थानबद्ध केले.
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याचा अल्टिमेटम मनसेने शिवसेनेला दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने औरंगाबाद येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाचा एक भाग म्हणून मनसेने क्रांती चौकात चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते औरंगाबाद पाणीपुरवठा योजनांतर्गत दिल्ली गेट जलकुंभ कामांची पाहणी करणार आहेत. परंतु मनसे पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवून त्यांना औरंगाबादचे नामांतर कधी करणार असा जाब विचारणार होते. परंतु त्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार हम से डरती है पुलिस को आगे करती है, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
सुहास दाशरते, सतनामसिंघ गुलाटी, गजन गौडापाटील, आशीष सुरडकर, संदीप कुलकर्णी, अशोक पवार, जॉन बोरगे, मनोज भींगारे या मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close