Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

मनसेच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांचा सत्कार

मनसेच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांचा सत्कार

औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औरंगाबादेत नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, व  शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या मार्गदर्शनात हा सत्कार सोहळा उस्मानापुरा येथे करण्यात आला.

याप्रसंगी औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार सिंधू राजू खरे, सत्यजित संजय क्षीरसागर, पूजा दीपक गायकवाड, कल्याणी भारत आवारे, काशीनाथ पुंजाबा भालेकर, अख्तर मुन्तु भाई सय्यद, रवींद्र काकासाहेब वाघ, आण्णा मगरे, यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष गजनगौडा पाटील, आशिष सुरडकर, अब्दुल रशीद खान, बद्री जाधव, अजय तळणकर, शुभम मगर, सतीश देवगिरीकर, आवारे पाटील, प्रवीण कडपे,राजू परळकर, बबलू सय्यद, उमेश दीक्षित, महेश ताहिलरमाणी, लीला राजपूत, सपना ढगे, रीना राठोड, अनिता लोमटे, हेमलता दिनोरीया, सरस्वती गवारे, नीतीन विंचूरकर, जॉन बोर्गे, मनोज भिंगारे, अभय मांजरमकर, डॉ.संकेत देशमुख, विकी जाधव, निलेश कावडे, निलेश औटी, चिन्मय कुलकर्णी, पाराजी चितळे, किशोर साळवे, संतोष कुटे, बाबुराव जाधव, चंदू नवपुते, दीपक पवार, नीरज बरेजा,  युवराज गवई, गणेश साळुंके, परमेश्वर बरसाले, नितीन वावरे, अमोल भावसार, रितीक पाटोळे, महेंद्र दाभाडे, राकेश भालेराव, नितीन पवार,अशोक मोरे, सचिन नळगिरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील यांनी केले तर आभार मनसेचे जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांनी मानले. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close