Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

आमदार अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरून विष प्राशन केलेल्या दत्ता भोकरे यांची भेट घेतली

औरंगाबाद: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवाजीनगर येथील दत्ता भोकरे या तरुणाने विष प्राशन केले होते हे समजताच आमदार अंबादास दानवे यांनी घाटी रुग्णालयात त्याची भेट घेतली.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवली जाईल व आपल्याला नोकरी लागेल या आशेवर हा तरुण होता परंतु न्यायालयाने मराठा आरक्षण वरील सुनावणी दोन आठवडे वाढवल्याचे कळताच या तरुणाने नैराश्यातून विषप्राशन केले घटना समजताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले होते त्याची प्रकृती स्थिर असून आमदार अंबादास दानवे यांनी घाटी रुग्णालयात त्याची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.

यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणाची ही कायदेशीर लढाई आहे राज्य सरकार भक्कमपणे आपली बाजू मांडत असून आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय लवकरच होईल मात्र मराठा तरुणांनी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलू नये संयम बाळगण्याची आवश्यकता आहे आपला जीव धोक्यात घालू नये आपण जिवंत असणं हे स्वतःसाठी व आपल्या परिवारासाठी अत्यंत आवश्यक आहे असे आवाहन केले

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close