Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता मुख्याध्यापिकेच्या हस्ते उद्‌घाटन

मुंबई, : शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन आज वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. 1995 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी शहीद झालेले कॅप्टन विनायक विष्णू गोरे यांच्या त्या मातोश्री आहेत.

हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त

श्रीमती गोरे यांनी आपला मुलगा शहीद झाल्यानंतर राज्यातील शाळाशाळांमध्ये जाऊन देशाच्या संरक्षणासाठी युवा पिढीने पुढे आले पाहिजे म्हणून व्याख्यानाद्वारे युवकांचे प्रबोधन केले. श्रीमती गोरे यांची तब्बल 8 पुस्तके आणि विविध वर्तमानपत्रात जनजागृती करणारे लेख प्रसिद्ध आहेत. माहे जानेवारी, 2017 मध्ये बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. विशेष म्हणजे श्रीमती गोरे या पार्ले टिळक विद्यालयातून मुख्याध्यापिका पदावरुन सेवानिवृत्त झाल्या आहेत.

हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान


आपल्या कार्यालयाचे उद्‌घाटन वीरमातेच्या हस्ते व्हावे, अशी राज्यमंत्री बच्चू कडू यांची इच्छा होती आणि श्रीमती गोरे यांना उद्‌घाटनाचा सन्मान देऊन अत्यंत आदराने आज मंत्रालयातील त्यांच्या दालन क्र.331, दुसरा मजला चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल, बल्लूभाऊ जवंजाळ तसेच अनेक पदाधिकारी आणि मंत्रालयातील अधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.

हेही वाचा “अटल आनंदवन घन वन” प्रकल्प जणू देवस्थानाची निर्मितीच :प्रधान मुख्य वन संरक्षक श्री.जीत सिंग

   
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close