Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ


    सिल्लोड /विशाल जाधव

दि.7, शेतकऱ्यांकडील असलेल्या शेवटच्या बोन्डापर्यंत सरकार कापूस खरेदी करेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस व्यापाऱ्याला कमी भावात न देता शासकीय कापूस खरेदी केंद्रात द्यावा असे अवाहन करीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस खरेदी केंद्रावर त्रास होणार नाही याची दक्षता घेत खरेदी केंद्रावर दररोज किमान 200 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी कसा करता येईल यासाठी उपाययोजना करा अशा सूचना महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.  सोमवार ( दि.7 ) रोजी वरुड – पिंप्री फाटा, ता. सिल्लोड येथील भगवान बाबा जिनिग येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ संपन्न झाला. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
  यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे,  कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, डॉ. संजय जामकर, पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब राकडे,गटविकास अधिकारी अशोक दांडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना सोयगाव तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, राजेंद्र ठोंबरे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, बाजार समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, संजय गौर, कौतिक मोरे, सतिष ताठे, हनिफ मुलतानी , नगरसेवक प्रशांत क्षीरसागर, मतीन देशमुख, विनोद भोजवाणी, हरिदास ताठे, आशिष कटारिया, विशाल जाधव, शेख इम्रान ( गुड्डू ) आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे क्षेत्र आहे . यावर्षी सततच्या पावसामुळे कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच पहिली वेचणी होताच बोन्ड अळी, लाल्या रोगाने कापूस पिकावर आक्रमण केले. यासाठी कापूस उत्पादकांच्या बांधावर जावून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा तसेच सरकार कडून भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close