Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

जीव माझा गुंतला लग्नसोहळा विशेष सप्ताह २० सप्टेंबरपासून कलर्स मराठीवर!

शुभ मुहूर्तावर येणार नव्या नात्याला आकार

नियतीच्या खेळीने होणार का अंतराचा मल्हार ?

जीव माझा गुंतला लग्नसोहळा विशेष सप्ताह २० सप्टेंबरपासून कलर्स मराठीवर!

मुंबई :  असं म्हणतात सात जन्माच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात…आयुष्याच्या  जोडीदाराची कुठल्यातरी टप्यावर भेट हि लिहूनच ठेवलेली असते. पण नियतीच्या खेळीत अडकलेले दोन जीव अंतरा मल्हार एकत्र कसे येणार ? अखेर अंतराचा मल्हार होणार का ह्याची सध्या जोरदार चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे. बहिणीच्या चालाखीने अंतरा-मल्हारच्या नात्याची गाठ बांधली जाणार ? गैरसमजातून हे नातं दूर जातंय का असं वाटत असतानाच नियतीने पुन्हा पुन्हा अंतर-मल्हारला एकमेकांसमोर आणलं. अचानक भेटण असो किंवा मग भांडण असो अंतरा-मल्हार एकमेकांना भेटत राहिले. कारण काहीही असलं तरी प्रत्येक टप्प्यावर प्रेक्षकांना मात्र हेच वाटत राहिलं कि श्वेताच बिंग फुटणार आणि अंतरा-मल्हार एकत्र येणार. पण नियतीचा हा खेळ थोडा अनपेक्षितच ठरला. श्वेताने रचलेले सगळेच डाव अनपेक्षितरित्या अंतरानेच पूर्ण केले आणि अंतरा-मल्हारचे सूर जुळणार कि नाही ह्या रोमांचक वळणावर प्रेक्षकांना घेऊन आले. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा नक्की बघा जीव माझा गुंतला लग्नसोहळा विशेष सप्ताह २० सप्टेंबरपासून सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर!

जीव माझा गुंतला ह्या मालिकेत श्वेताचे सगळे प्रयन्त यशस्वी होऊन मल्हार बोहोल्यावर चढणार का? पत्रिकेच सत्य समोर येऊनही अंतरा ते गुपित लपवून ठेवणार का? लग्नाच्या शुभमुहूर्तावर खर सगळ्यांसमोर येऊन चित्र पालटणार असं कुठेतरी वाटतं आहे. या शुभ मुहूर्तावर श्वेता, अंतरा आणि मल्हार यांचं आयुष्य नक्की कुठलं वळण घेणार ?  श्वेता आणि मल्हारच्या लग्नाच्या सगळ्या विधी पार पडत असताना अचानक असं नेमकं काय घडणार की मंडपात श्वेता ऐवजी अंतराला उभ राहावं लागणार ? मल्हार आणि अंतरा या लग्नाला विरोध करतील ? कि श्वेता नवा डाव खेळणार ज्यामुळे हा प्रश्न कायम राहणार होणार का… #AntaraChaMalhar ? हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा जीव माझा गुंतला लग्नसोहळा विशेष सप्ताह २० सप्टेंबरपासून सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर!

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close