Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

पत्रकार हा सामाजिक जीवनात प्रत्येकाचा आधार श्रीनिवास पा चव्हाण

नायगाव मराठी पत्रकार संघाचे नूतन ता.अध्यक्ष नागेश कल्याण व पदाधिकारी यांचा सत्कार

नायगाव /प्रतिनिधी
पत्रकार हा सामाजिक जीवनात प्रत्येकाचा आधार असून या आधारवडाच्या सेवेत आम्ही सदैव राहून त्यांच्या अडचणीत धावून जाण्यासाठी आम्हाला आवडते .पत्रकारांची सामाजिक भावनेतून त्यांच्या कार्याची दखल घेत सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला सत्कार कौतुका स्पद आहे.असे प्रतिपादन ता.ख.वि.संघाचे चेअरमन श्रीनिवास पा.चव्हाण यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.

      नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारीनिची नुकतीच निवड करण्यात आली त्याअनुषंगाने नायगावच्या सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील कल्याण यांच्यासह बालाजी बोरवेलचे  राजीव पाटील व मुद्रांक विक्रते यशवंतराव पाटील शिंदे यांच्या संयुक्तविद्यमाने नूतन नायगाव तालुका अध्यक्ष नागेश कल्याण व सर्व मराठी पत्रकार संघाच्या  निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार

नायगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या पटागंणात करण्यात आला

सेवा सहकारी सोसायटीच्या पटांगणात नुकतीच दि.27ऑगस्ट रोजी नुतन तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण व मराठी पत्रकार संघांची सर्व नूतन कार्यकारणी व पदाधिकारी यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पांडे, नायगाव तालुका मराठी माजी अध्यक्ष माधव मामा कोकुर्ले, माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोंखेडकर, सुरेश पाटील कल्याण एस.एम. मुदखेडकर , बाबाराव पाटील कल्याण, दैनिक गाववालाचे नायगाव तालुका प्रतिनिधी माधव चव्हाण, दैनिक प्रजावाणीचे पत्रकार विकास भुरे, बापूराव बडूरे ,बालाजी नागठाणे, मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गंगाधर ढवळे, शेख आरिफ ,माधव बैलकवाड ,कार्यध्यक्ष माधव धडेकर ,माधव पवार,संजय चिखले , मराठी पत्रकार संघाचे नायगाव शहराध्यक्ष विश्वांभर वने, बालाजी शेवाळे,ब्रम्हानंद देसाई ,दिलीप पाटील कल्याण ,सूर्यकांत पाटील कल्याण ,मराठा सेवा संघाचे सचिव संतोष कल्याण,प्रा.यादवराव पाटील शिंदे, साहेबराव शिंदे, बंडू पाटील शिंदे, बालाजी शिंदे, सुमित कल्याण, प्रशांत कोलमवार ,माणिक चव्हाण साहेबराव शिंदे ,किरण धनजे, शिवराज चव्हाण ,नगरसेवक प्रतिनिधी श्रीनिवास शिंदे ,नागरसेवक पांडू पाटील चव्हाण देवराज मदेवाड, बालाजी धोते, आदींसह
जळगाव शहरातील मूळ निवासी कल्याण, चव्हाण, शिंदे, बेळगे, मंगरुळे, धोते, बोमनाळे मदेवाड, परिवारातील बहूसंख्य मंडळीची उपस्थिती या सत्कार सोहळ्यास उपस्थिती होती. यावेळी सहकारी सोसायटीच्या वतीने उपस्थित असलेल्या 50 च्या वर पत्रकार बांधवांचा पेन, डायरी, पुष्पहार घालून यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला.


पत्रकार हा समाजाची न्यायिक धुरा वाहणारा वाहक बाळासाहेब पांडे

पत्रकार संघर्ष मय जीवनाचा साक्षीदार व समाजातील न्यायिक प्रश्न सोडवून देण्यासाठी प्रयत्न करणार भार वाहक असून समाजाच्या प्रश्नांची उकल करून त्याना न्याय देण्या साठी धडपडतो अश्या व्यतिमत्वाचा प्रदीप पाटील कल्याण व त्यांचे सहकारी यांनी केलेला सत्कार हा सामाजिक जाणिवेतून केलेलं कार्य आहे असे विचार बाळासाहेब पांडे यांनी सत्काराला उत्तर देताना मांडले.


पत्रकारांचा हा सत्कार निस्वार्थ भावनेचा -सूर्यकांत सोनखेडकर
सर्वत्र नेहमीच पत्रकारांचा सत्कार सन्मान स्वार्थासाठी केला जातो. पण या ठिकाणी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील कल्याण, यशवंत पाटील शिंदे, राजू पाटील यांनी घडवून आणलेला हा सत्कार म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना एकत्रित आणून पेन,डायरी व पुष्पहार घालून केलेला सत्कार हा सत्कार म्हणजे निस्वार्थ भावनेतून केलेला सत्कार असल्याचे उदगार अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांतजी सोनखेडकर यांनी काढले.

तंटामुक्त अध्यक्षपदी निवडी बद्दल माधव बैलकवाड यांचा सत्कार

सेवा सहकारी सोसायटी नायगावच्या वतीने पत्रकार माधव बैलकवाड यांचा सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन प्रदीप पाटील कल्याण व तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या वतीने करण्यात आला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close