माजलगाव ग्रामीण पोलिसांची कार्यवाही…
माजलगाव /रविकांत उघडे
पात्रूूड येथील शेतकरी कुलदीप इंद्रजित शिंदे वय 32 वर्ष व्यवसाय शेती यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 21/10/2021 रोजी रात्री 12 वाजल्यानंतर ते दि.22/10/2021 रोजी सकाळी सात वा.सुमारास पात्रूूड शिवारात सर्वे नंबर 367 मधील खळ्यावरील 38 पोते सोयाबीन अंदाजे 24 क्विंटल 4 हजार 800 रुपयांप्रमाणे एकूण 1 लाख 15 हजार 200 रुपयांचे सोयाबीन चोरी गेल्या बाबतचे फिर्यादीवरून कलम 379 भा.दं.वी.प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील तपासात आरोपी माजेद पाशा शेख, अन्वर मज्जीद कुरेशी,शेख महेबुब शेख रशीद,नवीद सलीम शेख,सईद इनामदार,समीर अमीर शेख,मोसीन लालामियां आतार,नवीद अन्वर शेख सर्व रा.पात्रूूड असे सर्वांनी मिळून सईद इनामदार यांचे पिकअप गाडी घेवून कुलदीप इंद्रजित शिंदे यांचे शेतातील काढून ठेवलेले सोयाबीनचे 38 पोते पिकआप गाडीमध्ये भरुन ते लातूर येथील व्यापाऱ्याला विक्री केले आहेत.असे तपासात निष्पन्न झाले आहे.यामध्ये आरोपी माजेद पाशा शेख वय 30 वर्षे,अन्वर मजीद कुरेशी वय 21 वर्षे,दोन्ही रा.पात्रूूड यांना दि.5/01/2022 रोजी अटक करुन दि.13/01/2022 रोजी पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात येवून तपास करण्यात आला असून आरोपी शेख महेबुब शेख रशीद वय 20 वर्षे,सईद समीयोदीन इनामदार वय 24 वर्षं रा.पात्रूूड यांना दि.28 जानेवारी रोजी अटक केली असून आरोपी सईद समीयोदिन इनामदार याचे कडून सोयाबीन चोरी करतांना वापरलेली अशोक लिलेंण्ड कंपनीचे दोस्ती पिकअप क्र.एम.एच.23. एयु.3186 किमंत अंदाजे 3 लाख रुपयाचे जप्त करण्यात आले.तसेच दि.30/01/2022 रोजी सदर गुन्ह्यात चोरी गेलेले सोयाबीन 19 क्विंटल 60 किलो प्रति क्विंटल 4325 रुपये प्रमाणे एकूण 84 हजार 770 रुपये किमतीचे सोयाबीन जप्त करण्यात आले.
वरील कार्यवाही पोलीस निरीक्षक मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जोनेवाल साहेब,सहाय्यक फौजदार सुनील आईटवार,पोलीस नाईक तुकाराम ढोबळे,पोलीस नाईक संजय राठोड,पोलीस अंमलदार रफिक निन्सुरवाले,पोलीस अंमलदार कैलास पोटे यांनी केली आहे.