Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

प्रतिबंध,शोध मोहीम आणि तपास या त्रिसूत्रीचा अवलंब करणार – पोलीस अधीक्षक नीवा जैन


उस्मानाबाद (प्रतिनिधी) उस्मानाबाद जिल्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप आणि त्यावर करावयाच्या कायमस्वरूपी उपाय योजनेसाठी आपण प्राधान्य आहोत. प्रतिबंध शोध मोहीम आणि तपास यंत्रणा या त्रिसूत्रीचा वापर प्राधान्याने करणार असल्याचे मत उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांनी व्यक्त केले.उस्मानाबादेत प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कुमार काँवत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह जनसंपर्क अधिकारी विनोद चौधरी यांची यावेळी उपस्थिती होती जैन माध्यमांशी बोलताना म्हणाले की श्री तुळजाभवानी मातेच्या पवित्र भूमीत काम करण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे माझी नेमणूक होऊन काही दिवस झाले आहेत.७ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने नवरात्र उत्सव साजरा होत आहे त्यादृष्टीने योग्य नियोजन करण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगितले अपर पोलीस अधीक्षक नवनीत कुमार म्हणाले की,उस्मानाबाद जिल्ह्यातील गुन्हे गाडी रोखण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न आपल्या कडून केले जाणार आहे. त्यासाठी जनता आणि पोलीस यामधील दुवा म्हणून माध्यम प्रतिनिधींनी योग्य वेळी योग्य माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी. त्या दृष्टीने कारवाई करण्यास मदत होईल असे माध्यम प्रतिनिधींना आवाहन केले. तुळजापुरातील अवैध धंद्या बाबत माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता जैन म्हणाले की या संदर्भात नवरात्र पार पडल्यानंतर ठोस कृती कार्यक्रम हाती घेतला जाईल.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close