Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

फेसबुकवर पोस्ट टाकतअ.भा.छावाच्या पैठण युवक तालुकाध्यक्षाची एस.टी.बस समोर उडी मारून आत्महत्या

नेवासा – नगर रोडवरील कांगोणी फाटा येथिल घटना

औरंगाबाद / प्रतिनीधी
फेसबुकवर व्यक्तिगत आयुष्यात त्रास असल्याची पोस्ट टाकत अखिल भारतीय छावा संघटनेच्या पैठण तालुक्यातील युवक तालुका अध्यक्षाने एस.टी.बस समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नेवासा-नगर महामार्गावरील कांगोणी फाटयाजवळ घडली.या घटनेमुळे पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महेश पाटील शिंदे (वय 23) रा.आमरापूर वाघूडी, ता.पैठण असे आत्महत्या करणार्‍या तरूणाचे नाव आहे.या घटनेची अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून महेश हा तणावात होता.मात्र कोणत्या कारणाने तो तणावात होता हे त्याने कुणालाही सांगितले नाही.मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याने फेसबुकवर आयुष्यात खूप त्रास आहे.माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका अशी पोस्ट टाकली. व त्यानंतर काही वेळातच त्याने अहमदनगर-नेवासा मार्गावरील कांगोणी फाट्याजवळ दुचाकी बाजूला उभी करून भरधाव जाणार्‍या एस.टी.बस समोर उडी घेत आत्महत्या केली. महेशला नागरिकांनी तातडीने जवळील नेवासा येथील शासकीय रुग्णालयात हलविले मात्र गंभीरपणे जखमी झाल्याने व अति रक्तस्त्राव झाल्याने तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.वैद्यकीय अधिकार्‍यांनी महेशला मृत घोषित केले. पैठण जवळील मूळ गाव रा.आमरापूर वाघूडी, ता.पैठण येथे आज दुपारी महेशवर अंतिम संस्कार करण्यात आले.
………………………………………………..
पोस्ट नंतर अनेकांचे कॉल,
कमेंटच्या माध्यमातून केली विनवणी

संध्याकाळी जेंव्हा महेश ने फेसबुकवर आत्महत्या करीत असल्याची पोस्ट टाकली ती पोस्ट पाहून त्याच्या मित्र,जवळील नातेवाईक अशा अनेक लोकांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने आत्महत्येपूर्वी मोबाईल बंद करून ठेवला होता. अनेकांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करून टोकाचे पाऊल उचलू नकोस अशी विनवणी केली मात्र तो पर्यंत त्याने बस समोर उडी घेतली होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close