Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

जिल्ह्यात सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

औरंगाबाद/ प्रतिनिधी –
निवडून आलो भाऊ पण ,गावचा कारभारी कोण कोणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे ,सध्या या गप्पा ग्रामीण भागा मध्ये मोठ्या प्रमाणात रंगत आहे.

ज्याची उत्हुकता लागली होती त्यांची तारीख जाहीर झाली आहे.विषयसता
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावागावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. यामध्ये अनेकांनी मोठ्या मेहनतीने विजय मिळविला. पण सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे आरक्षण सोडत न झाल्याने निश्चित नव्हते. आता प्रशासनाने आरक्षण सोडतीची तयारी केली असून, २९ जानेवारीला सरपंच, उपसरपंच पदासाठी सोडती निघणार आहेत. त्यामुळे सोडतीत काय होणार , कोणते आरक्षण निघणार याविषयी इच्छुकांची मात्र धाकधूक वाढली असून भावी सरपंच कोण असेल या चर्चांना उधाण आले आहे.

जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतीचे निकाल १८ जानेवारीला जाहीर झालेत. गावातील राजकारणात कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडली तर कोणाच्या नशिबी पराभव आला. विजयी झालेल्यांचे लक्ष मात्र सरपंचपद आरक्षण सोडतीकडे लागलेले आहे. त्यानुसार प्रशासनाने २९ जानेवारीला तहसीलस्तरावर आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले, यापूर्वी आठ डिसेंबरला शासन आदेशानुसार सरपंच, उपसरपंच पदासाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. पण ही सोडत शासन आदेशानुसार रद्द करण्यात आली. आता येत्या २ ९ जानेवारीला नव्याने सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानुसार तहसीलदारांना कळविण्यात आले आहे . ही सोडती नव्याने निघणार असल्या तरी सोडतीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविली जाणार आहे. ग्राम पंचायत निवडणूक होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने सरपंच – उपसरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचे आदेश दिले होते. ते आदेश रद्द करून निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत नव्याने सोडत घेण्याबाबत शासनाने आदेश दिला होता. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सरपंच, उपसरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे आरक्षण सोडतीनंतर निश्चित होणार आहे. यामुळे इच्छुकांची धाकधूक मात्र वाढली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close