Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

संभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास

संभाजीनगर | दि.११ शिवसेना हा फक्त पक्ष नसून हे एक मजबूत संघटन आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून आणि संस्कारातून ही शिवसंपर्क मोहीम ११ जुलै ते ३१ जुलै दरम्यान राबविण्यात येणार असून तळा गळातील शिवसैनिक जोडला गेला पाहिजे असे आदेश पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील ही शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल असा विश्वास शिवसेना प्रवक्ते, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. अमरप्रित चौकातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते.

या शिवसंपर्क मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, उपशहरप्रमुख रतन साबळे , शाखाप्रमुख स्वप्नील साबळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेना विकासाच्या आणि सामाजिक कार्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. कोरोनाच्या या परिस्थितीतही सामाजिक कार्यात अग्रेसर राहून गोरगरीबांच्या मदतीला शिवसेना नेहमीच उभी राहिली आहे. शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक माणसामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य होईल. स्वबळ केवळ सत्ता मिळविण्यासाठी नसून शिवसेनेचे कार्य आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहचवण्याचे व्रत आहे. या शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकांनी शिवसेनेचे विचार प्रत्येकापर्यंत पोहचवून शिवसेनेचे स्वबळ मजबूत करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख-आमदार अंबादास दानवे यांनी केले.

शिवसंपर्क मोहिमेत वैजापूरातील शिवसैनिकांशी संवाद :

रविवारी वैजापूर तालुक्यातुन या मोहिमेची सुरवात करण्यात आली. शिवसेना प्रवक्ते तथा जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी गारज, पिंपळगाव खरज, शिऊर, सवंदगाव, वैजापूर शहर यठीकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय बैठका घेतल्या. या बैठकीप्रसंगी वैजापूर मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रा. रमेश बोरणारे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, तालुका प्रमुख सचिन वाणी, जे.के. जाधव,जी प सदस्य मनाजी मिसाळ,रामहरी बापू जाधव,कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय निकम तालुकाप्रमुख पी एस कदम, गोरख आहेर विभागप्रमुख प्रभाकर जाधव, भिकन सोमासे, अंबादास खोसे महिला आघाडी जिल्हा संघटक लता पगारे सुलभा भोपळे यांची उपस्थिती होती. बैठकीत संघटनात्मक पक्षबांधणी ,बुथ रचना ,बुथप्रमुख, गटप्रमुख ,सहगटप्रमुख यांच्या नियुक्त्या , पदाधिकारी यांच्या अडीअडचणी, कोरोना मुक्त गाव याविषयी आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सर्व सर्व आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख गटप्रमुख उपशाखाप्रमुख ,जिप पस, नप, सदस्य युवा सेना व महिला आघाडीचे व अन्य सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

शिवसैनिकाने शिवसेनेचा बाणा सोडू नये

सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. या संघटनेची ताकद ही वेगळी आहे. आपला हा पक्ष नसून हे एक संघटन आहे. आणि हे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी अंगी प्रभावी धमक बाळगली पाहिजे. जनतेच्या हितासाठी आपण काम करायला पाहिजे. आपला हेतू स्वच्छ आणि पारदर्शक असला तर तो लोककल्याणासाठी चांगला अनुभव ठरेल. संघटना म्हणून आपण एकच आहोत ही भूमिका ग्रामपंचायत, पंचायत समिती मध्ये आपण ठेवायला पाहिजे. शिवसैनिकाने आपल्या कामाची प्रसिद्धी केली तर केलेल्या विकासकामांचे श्रेय आपण ज्यांनी केले असेल त्यांना ते द्यायलाच पाहिजे. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेने केलेल्या विविध विकासकामांचे चावडी वाचन गावागावात आम्ही करणार असल्याची संकल्पना यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close