Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

औरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड


औरंगाबाद / प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या औरंगाबाद पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद निरीक्षक जगन्नाथ पाटील, शहराध्यक्ष दत्ता भांगे, शहर कार्याध्यक्ष कय्युम अहेमद यांनी नुकतेच अफरोज पटेल यांना निवडीचे पत्र दिले. राष्ट्रवादी युवकचे नुतन औरंगाबाद पश्चिम विधानसभा अध्यक्ष अफरोज लतिफ पटेल हे सन २०११ पासुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. राष्ट्रवादीच्या युवकांची मजबुत फळी निर्माण करुन त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार सक्रीयपणे केलेला आहे. त्यांच्या आजतागायत केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची निवड करण्यात आली असुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन सर्वसामान्य युवकांच्या विकासात ते भरीव कार्य करतील व पक्ष संघटना मजबुतीने उभे करतील. असा विश्‍वास राष्ट्रवादी युवकचे औरंगाबाद पश्चिम विधानसभा अध्यक्ष अफरोज लतिफ पटेल यांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठांनी सोपवलेली प्रत्येक जबाबदारी मी निष्ठापुर्वक आणि सक्रीयपणे, प्रामाणिकपणे पार पाडीन. असे मत यावेळी राष्ट्रवादी युवकचे नुतन औरंगाबाद पश्चिम विधानसभा अध्यक्ष अफरोज लतिफ पटेल यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता भांगे, शहर कार्याध्यक्ष कय्युम अहेमद, पुर्व विधानसभा अध्यक्ष अमोल देशमुख, कार्याध्यक्ष शेख मेहबूब बाबा, सय्यद निजाम, मध्य (वि.स) अध्यक्ष जुबेर खान, मध्य (वि.स) कार्यध्यक्ष इस्माईल राजा, रमेश घाडगे पाटील, यासिर खान, वसिम मनियार, शेख इफ्तिकार, के.के. पाटील, आसिफ शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close