Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

ग्राम पंचायतीचा निकाल ; मिरवणुका, सभा, आतषबाजी, बॅनरबाजीला पोलिसांकडून मनाई ; जल्लोष करणाऱ्यांवरही होणार कारवाई

मुबांई/एम एच 20लाईव्ह नेटवर्क

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आज (दि.१८) सोमवार रोजी मतमोजणी होत आहे. दुपारपर्यंत सर्वच ग्राम पंचायतीचे निकाल लागण्याची श्यक्यता असून निकालानंतर विजयी मिरवणुका काढणे, सभा, जल्लोष, आतषबाजी, भंडारे व बॅनरबाजीला पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहर व ग्रामीण पोलिसांनी दिला असल्याने गावपातळीवर उत्साही कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त यांनी जमाव बंदी व शस्त्र बंदी आदेश लागू केले असून ग्रामपंचायतीच्या सर्वच उमेदवार तसेच कार्यकर्त्यावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सीआरपीसी कलम १४४ अन्वये जमावबंदी व अधिनियम १९७१ चे कलम ३७(१), ३७ (३) अन्वये शस्त्रबंदी आदेश लागू केले आहेत. त्यामुळे विजयी आणि पराजित उमेदवार, समर्थक, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन वा जमून जल्लोष, घोषणाबाजी, मिरवणूक, शक्तिप्रदर्शन करू नये. त्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. गावात, गल्लीमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, आक्षेपार्ह, वादग्रस्त बॅनर किंवा होर्डिंग्ज लावू नयेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणाच्याही भावना दुखावतील असे विधान, व्हाट्सअॅप किंवा टेम्पलेट, पोस्ट किंवा संदेश प्रसारित किंवा फॉरवर्ड करू नये. अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर सार्वजनिक शांतता तसेच सार्वजनिक स्तरावर नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल असे कोणत्याही स्वरूपाचे वर्तन केल्यास गुन्हे दाखल केले जातील.

सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, तसेच कोणत्याही स्वरूपातील गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशा सूचनाही पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत. औरंगाबाद शहरातही हेच नियम लावण्यात आले असून नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ९ ठिकाणी मतमोजणी

औरंगाबाद जिल्ह्यात ५७९ ग्रामपंचायतींसाठी ९ लाख ४२ हजार ५३५ मतदारांनी शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावला असून  सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली.  जिल्ह्यात नऊ तालुक्यांत तालुका पातळीवर मतमोजणी केली जाणार आहे. साधारणत: दुपारी एक वाजेपर्यंत निकाल लागतील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी दिली. जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यामध्ये ३८ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे उर्वरित ५७९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. यामध्ये वैजापूर तालुक्यात सर्वाधिक ९६, औरंगाबाद ७१, पैठण ७८, फुलंब्री ४९, सिल्लोड ७७, सोयगाव ३६, कन्नड ८०, खुलताबाद २५, गंगापूर ६७ ग्रामपंचायतींचे निकाल दुपारपर्यंत जाहीर होतील.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे आवाहन

कोरोनाचे संकट अद्यापही संपलेला नाही. विजयाचा आनंद साधेपणाने साजरा करा, पराजय खिलाडूवृत्तीने स्वीकारा, असे आवाहन करत त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीच हे आदेश काढण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी स्पष्ट केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close