जालना । प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार दिलीप राठी यांचा स्व. दिगंबरराव शिंदे स्मरणार्थ जालना भुषण पुरस्कारांने शुक्रवार (दि 11) रोजी सन्मान करण्यात आला.
दर्पण दिनानिमित्त गुरुवार (दि 6 जाने) रोजी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने पत्रकारांना जिल्हा स्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार दिलीप राठी हे त्यांच्या व्ययक्तीक अडचणींमुळे उपस्थित राहू शकले नव्हते. याबाबत त्यांनी तसे आयोजकांकडे कळविले ही होते. त्यामुळे शुक्रवार (दि 11) रोजी ज्येष्ठ पत्रकार दिलीप राठी यांचा प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस विजयकुमार सकलेचा यांच्या हस्ते स्व. दिगंबरराव शिंदे स्मरणार्थ जालना भुषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. यावेळी कॉन्सीलचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसंगी श्री राठी यांनी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रच्या पदाधिकार्यांचे आभार व्यक्त केले. व दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहता आले नसल्याची खंतही व्यक्त केली.