Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादराजकीय

रक्तदात्यास मोफत मेडीक्लेम, मनसेचे अभिनव रक्तदान शिबिर

औरंगाबाद – मनसे पूर्व विधानसभेच्या वतीने रविवारी (दि.२६) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मनसे उपशहराध्यक्ष आशिष सुरडकर यांनी या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले. यास आसरा सोशल फाउंडेशनच्या या रक्तपिढीने हे रक्तसंकलन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे या वेळी रक्तदात्यास एक वर्षासाठीचा रुपये २ लाख किंमतीचा विमा तसेच दात्यास मोफत मोबदला रक्तपिशवी भेट देण्यात आली. यावेळी तब्बल ४३ दात्यांनी रक्तदान केले. कोरोना काळात रक्तदानाचे महत्व मोठ्या प्रमाणात सर्वाना जाणून आले. मात्र याच काळात कोरोना संसर्गाच्या भीतीने लोक रक्तदान करण्यास समोर येत नाही. मात्र दात्याच्या आरोग्याची देखील काळजी घेत हा रक्तदान शिबिर घेण्यात आला. पुढील एक वर्षासाठी सर्व दात्याना दोन लाखापर्यंतचा विमा कव्हर भेट देण्यात आला तसेच रक्तदात्यास त्यास गरज असेल तेव्हा दात्यास मोफत रक्तपिशवी देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, नूतन जैस्वाल, संदीप कुलकर्णी, गजन गौडा पाटील, रीना राठोड, प्रशांत जोशी यांनी भेट दिली. शिबिराच्या यशस्वितेसाठी अमित जैस्वाल, सागर राजपूत, अशोक पवार, सोमु पाटील, चिन्मय कुलकर्णी, कृष्णा घायट, नितीन कल्याणकर, राजू चव्हाण, दत्ता भिंगारे, अक्षय बोंद्रे, विद्या देगलूरकर, प्रतीक जोशी आदींनी परिश्रम घेतले. कोरोना काळात लोक रक्तदानास पुढे येत नाहीत. संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. याच मूळे आसरा फाउंडेशनच्या सहकार्याने आम्ही हा शिबीर आयोजित केला. तसेच दात्याच्या आरोग्याची जबाबदारी देखील आपली हे ओळखून मोफत मेडिक्लेम देण्याचे नियोजन केले. यास भरभरून प्रतिसाद मिळाला. रक्तदानाच्या कार्यक्रमाने मोठे आत्मिक समाधान प्राप्त झाले.
— आशिष सुरडकर, आयोजक तसेच मनसे पूर्व विधानसभा उप शहराध्यक्ष

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close