मुंबई, 04 मे : शेवग्याच्या शेंगा (Drumstick) आपल्याकडे अनेकजण आमटीमध्ये वापरतात, शेवग्यामुळे आमटीची चव तर वाढतेच शिवाय शेवगा आरोग्यासाठी उपयोगी आहे. शेवग्याच्या शेंगा व्यतिरिक्त आपण त्याच्या फुले आणि पानांबद्दल बोलायचे झाल्यास त्याचाही आरोग्यासाठी खूप फायदा होतो. शेवग्याच्या विविध घटकांमध्ये (शेंगा, पाने, फुले) मधुमेहामध्ये (Diabetes) रक्तातील साखर नियंत्रित (Blood Sugar) करण्यापर्यंतचे अनेक गुणधर्म आहेत. शेवग्याची पाने आपल्याला कुठेही सहज सापडतील.
ड्रमस्टिकच्या पानांपासून बनवलेली पावडर तुम्ही कोणत्याही दुकानातून किंवा ऑनलाइन सहज मिळवू शकता. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या कोरड्या पावडरवर तुमचा विश्वास बसत नसेल, तर लहान हिरव्या पानांचा वापर करणे योग्य ठरेल.
शेवगा मधुमेहामध्ये वरदान –
द हेल्थसाइटनुसार, शेवग्याचा वापर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी केला जातो. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ड्रमस्टिकच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंट क्लोरोजेनिक ऍसिड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही शुगरचे रुग्ण असाल तर चहाऐवजी शेवग्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्यायला सुरुवात करावी.
ड्रमस्टिक चहा –
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त शेवग्याची काही ताजी पाने धुऊन उन्हात वाळवायची आहेत आणि नंतर त्यांची पावडर बनवायची आहे. चहापत्तीसारखा वापर करायचा. या पावडरचा चहा रोज प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
वजन कमी होते
शेवग्याच्या चहामध्ये (Moringa Tea) डाईयूरेटिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरातील पेशींमधील अनावश्यक पाणी कमी होते. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात. फायबर युक्त ड्रमस्टिक चहा शरीरातील चरबी शोषण कमी करते. इन्सुलिनचा प्रतिकार कमी करून अनावश्यक चरबी जमा होण्यास प्रतिबंध होतो.
रक्तदाब कमी करण्यासाठी देखील फायदेशीर –
ड्रमस्टिकच्या हिरव्या पानांच्या अर्कांमध्ये आयसोथियोसायनेट आणि नियाझिमिन असतात. हे असे संयुगे आहेत जे रक्तवाहिन्या जाड होण्यास प्रतिबंध करतात, ज्यामुळे रक्तदाबामध्येही याचा फायदा होतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे.MH20LIVE NETWORK (MH20LIVE) त्याची हमी देत नाही.)