Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादशेतीविषयक

बँकांनी शेतकऱ्यांना जलदगतीने पिक कर्जाचे वाटप करावे– जिल्हाधिकारी उदय चौधरी

* कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करु नये

* पिक कर्ज वाटपाचे उदिष्ट तातडीने पूर्ण करावे

औरंगाबादmh20live.com सध्या पेरणीचे दिवस आहे ,बि-बियाणे खरदी करण्याची वेळ आहे.आशा वेळेत शेतकर्याची कोणी आडवणूक करू नाही, बँक आधीकार्याने सहकार्य करूण खरीप हंगामासाठी बँकांनी शेतकऱ्यांना जलदगतीने पीक कर्जाचे वाटप करावे. साधारण जुलै महिन्याच्या अखेरपर्यत पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट बॅंकांनी पूर्ण करावे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे अडवणुक करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज खरीप पीक कर्ज वितरणाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेच  व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक ए.आर. शिंदे, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभाग प्रमुख ए.बी. थोरात आदींसह विविध बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना पिक कर्जाचे सुलभ पध्दतीने वाटप करण्याची  सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले की,  पीक कर्जासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून बँक व्यवस्थापनाने  सातबारा किंवा इतर कागदपत्रे मागू नयेत, ही कागदपत्रे बँकेने स्वत: ऑनलाईन डाऊनलोड करावीत किंवा तलाठयांकडे त्याची मागणी करावी. केवळ कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणुक करु नये. विशेष म्हणजे बँकांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना जलदगतीने पीक कर्जाचे वाटप करावे. दरम्यान, उपस्थित बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कुठलीही अडचण भासू न देता  पिक कर्जाचे वाटप तातडीने करण्यात येईल, अशी ग्वाही  दिली.

औरंगाबाद जिल्हयाला यंदा  रुपये 1196.80 कोटी  इतके पिककर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत 64 हजार 225 सभासदांना  321 कोटी 53 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. किसान क्रेडीट कार्डच्या संकेतस्थळावर पिक कर्जासाठी एक लाख 21 हजार 541 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती श्री. कारेगावकर यांनी दिली. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close