:उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. निवडणूक झालेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवण्यात भाजपला यश आलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं असून मतदारांचे आभार मानले आहेत. या निवडणुकीवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या विजयात वाटा उचलणाऱ्या घटकांचाही उल्लेख केला आहे.
दिल्ली, : पक्षाचा प्रत्येक छोटा आणि मोठा कार्यकर्त्यांने विजयाचा चौकार लावला आहे. यूपीमध्ये आपण सलग विजय मिळवला आहे. यूपी, गोवा, मणिपूरमध्ये भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. गोव्यात सर्व एक्झिट पोल चुकीचे ठरले आहे. तिथल्या जनतेनं तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक पक्ष कार्यकर्त्यांचं कौैतुक केलं.
‘आज उत्साहाचा दिवस आहे. या निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचा मी आभारी आहे. आणि त्यांचे अभिनंदनही करतो. विशेषत: आमच्या माता-बघिणी आणि तरुणांनी ज्याप्रकारे भाजपला प्रचंड समर्थन दिलं तो एक खूप मोठा संदेश आहे. निवडणुकीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी मला वचन दिलेलं की, यावेळी होळी 10 मार्चपासूनच सुरु होईल. आमच्या कर्मठ कार्यकर्त्यांनी विजय मिळवून स्वप्न सत्यात उतरवलं आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत केली. आमचे कार्यकर्ते जनतेचं मन जिंकण्यात यशस्वी ठरले.
पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमाने आज एनडीएसाठी एक विजयी चौकार लगावला आहे. उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले. पण पाच वर्षाचा कार्यकाळ पुरा करणाऱ्या मुख्यमंत्र्याची पुन्हा निवड होण्याचं हे पहिलं उदाहरण आहे. उत्तर प्रदेशात 37 वर्षांनी एक सरकार लगातार दुसऱ्यांदा सत्त्यात आलं आहे. युपी, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपचा विजय झाला आहे. दहा वर्ष सत्तेत राहिल्यानंतरही भाजपच्या जागांची संख्या वाढली आहे. उत्तराखंडमध्येही भाजपने नवा इतिहार रचला आहे. राज्यात पहिल्यांदाच कोणता पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे. एक समुद्रतटीय राज्य, एक गंगेचा आशीर्वाद प्राप्त राज्य, पूर्वतर सीमेचा राज्य, भाजपला चारही दिशांनी आशीर्वाद मिळाला आहे. या राज्यांचे आव्हानं भिन्न आहेत. सर्वांच्या विकासांच्या यातनेचा मार्ग भिन्न आहेत. पण सर्वांना एक गोष्ट विणत आहे ती म्हणजे भाजपवरील विश्वास.
10 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर भाजपची संख्या वाढली आहे. उत्तराखंडमध्येही भाजपची संख्या वाढली आहे. तिथे दुसऱ्यांदा आपण सत्तेत आलो आहेत. सीमेजवळ असलेलं राज्य, समुद्राच्या किनाऱ्यावर आणि डोंगराळ प्रदेशात असलेलं राज्य, गंगेच्या किनारी असलेल्या राज्यात आपल्याला आशिर्वाद मिळाला आहे. हा भाजपवर जनतेचा विश्वास आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
देशा आत्मनिर्भर झाल्याचा विश्वास सध्याच्या परिस्थितीत वाटतो
बजेटमधून अधिक बळ मिळाले
उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी दूरदृष्टीचा परिचय दिला
भारताच्या मतदारांनी स्थिर सरकारसाठी मत दिले
लोकशाही भारतीयांच्या रक्तात आहे