नवी दिल्ली, 10 मार्च: उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्याशानदार कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (10 मार्च) संध्याकाळी दिल्लीतील भाजप मुख्यालयाला भेट देणार असून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. ट्रेंडमध्ये भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बहुमत मिळवलं आहे तर मणिपूर आणि गोव्यातही चांगली कामगिरी केली आहे.