Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरोग्य विभागातील परीक्षा वेळा पत्रकाचे नियोजन करून अर्जा प्रमाणे प्रवेश पत्रे द्यावा -राजेंद्र दाते पाटील यांची मागणी

मुबाई:मराठा समापजातील विद्यार्थ्यांच्या  महाराष्ट्र शासनाच्या वतीने येत्या 28 फेब्रुवारी 2021 रोजी आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी परीक्षा घेतल्या जाणार आहे; परंतु या मध्ये  विद्यार्थ्यांची प्रचंड अशी मोठी कोंडी झालेली  आहे.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शैक्षणिक अहर्ते नुसार  विविध पदासाठी नोकरी अर्ज केलेले आहेत. परंतु शासनाच्या प्रशासकीय धोरणा नुसार  समस्त मराठा एस ई बी सी विद्यार्थी वर्गाला त्यांचे परीक्षाचे  पेपर देता येणार नाही, कारण या परीक्षा एकाच दिवशी दोन सत्रा मध्ये घेतल्या जाणार आहे.                या एकमेव कारणा मुळे जर  एका विद्यार्थ्याने कितीही पदासाठी अर्ज केलेले असले तरीही त्याला इच्छा असूनही जास्तीत जास्त दोनच पेपर देता येणार आहे तेही एकाच जिल्ह्यात फॉर्म भरले असले तरच, म्हणुन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तात्काळ  निवेदन पाठवून मागणी केली आहे की,  विद्यार्थी वर्गाने भरलेल्या सर्व अर्जाचे प्रवेश पत्र देण्याचे निर्देश तात्काळ देण्यात  यावे.एस ई बी सी  प्रवर्गातून अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाने  इ डब्लू एस  10% आरक्षण हा पर्याय उपलब्द्ध करून दिलेले आहे परंतु  सदरच्या आरोग्य विभागाच्या  या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अनेक अर्ज करूनही फक्त दोनच प्रवेश पत्र येत आहेत, परंतु उर्वरित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यानीं भरलेल्या अर्जा पैकी  सर्वच प्रवेश पत्र आले आहेत हा मराठा समाजावर अन्याय होत असल्याची भावना विद्यार्थी वर्गात निर्माण झाली असुन सर्व विद्यार्थी वर्गाने जवळपास  विविध पदासाठी अर्ज केलेले  आहेत. नियोजनाचा अभाव असल्यामुळे एकाच दिवशी परीक्षा पेपर घेण्याचे आयोजले असल्याने विद्यार्थ्यांना   कोणताही एकच पेपर देता येणार आहे त्यामुळे उर्वरित पदांच्या परीक्षा देण्यापासून विद्यार्थी वंचित राहणार आहेत.म्हणुन ज्या ज्या विध्यार्थी वर्गाने एका पेक्षा जास्त पदांचे प्रवेश अर्ज भरलेले आहेत त्या सर्व परीक्षा घेण्याचे वेगवेगळे दिवस असावेत म्हणजे कुणीही विद्यार्थी उमेदवार आरोग्य विभागाच्या कुठल्याही परीक्षा पेपर देण्या पासुन वंचित राहणार नाही असे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना  केली आहे.विद्यार्थी हीत लक्षात घेता सर्व परीक्षा पेपर वेगवेगळ्या दिवशी घेण्यात यावेत व तत्पूर्वी सर्व विद्यार्थी वर्गाने भरलेल्या सर्व पदासाठी परीक्षा देण्याचा अधिकार असताना आणि विविध पदासाठी शुल्क सुद्धा भरली असताना अशा परीक्षा देण्यापासून वंचित ठेवणे म्हणजे हा त्यांचावर अन्याय ठरणार आहे असल्यामुळे ज्यांनी ज्यांनी दोन किंवा दोन पेक्षा जास्त पदासाठी अर्ज दाखल केले आहेत त्या सर्वांनां परीक्षा प्रवेश पत्र निर्गमित करण्याचे तात्काळ आदेश व्हावेत आणि  सर्व विद्यार्थी वर्गाला त्यांनी भरलेल्या सर्व प्रवेश अर्जानुसार परीक्षा देण्यासाठी वेळा पत्रकाचे  नियोजन करणे  गरजेचे असुन प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक पदासाठी पेपर देता आला पाहिजे अशी वेळापत्रकाची व्यवस्था करून तसे सुद्धा तात्काळ नियोजन करण्याचे आदेश संबंधित विभागास व्हावेत अशी विनंती आपल्या निवेदनात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजेंद्र दाते पाटील यांनी केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close