Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

नगर- औरंंगाबाद रोडवर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

नेवासा/ प्रतिनिधी – अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्‍यातील देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच अपघात आज पहाटे दोनच्या सुमारास झाला. या अपघातात कारमधील पाचही जण जागीच ठार झाले आहेत. सर्व मृत जालना जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  स्वीफ्ट कार (एमएच २१ बीएफ ७१७८) ही औरंगाबादहून नगरकडे येत होती. देवगड फाट्याजवळ नगरहुन औरंंगाबादकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बस सोबत (एमएच १९ वाय ७१२३) तिची धडक झाली. ही धडक इतकी भिषण होती की, कारमधील पाच जण जागीच ठार झाले. अपघातात कार बसच्या समोरील बाजूने घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातादरम्यान मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. तसेच पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक तुरळक होती. त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला नाही.

या अपघाताची माहिती समजताच नेवासा पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र गंभीर जखमी झालेले कारमधील सर्व पाचही जणांचा उपचारापूर्वीच मरन पावले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच रस्त्यात पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही. तसेच बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही. यासंबंधी पुढील कार्यवाही नेवासा पोलिस करत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close