कन्नड ( प्रतिनिधी) राष्ट्र पुरुषांचा अवमान प्रकरणी आघाडी सरकार आणि भाजप विरोधात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुकारलेल्या बंद ला शहरासह ग्रामीण भागातुन उस्फुर्त प्रतिसाद दिसून आला.छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महत्मा जोतिबा फुले,आद्यशिक्षका सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्रारी यांनी बेताल व्यक्तव केल्याच्या निषेधार्थ रायभान जाधव विकास आघाडीने शनिवार दिनांक ५ मार्च रोजी कन्नड बंद ची हाक दिली होती या बंदला कन्नड शहरा सह ग्रामीण भागात उत्सुर्त प्रतिसाद दिसून आला . ग्रामीण भागातील पिशोर ,कंरजखेड , चिंचोली ( लिंबाजी ) ,चिकलठाण या परिसरा सह कन्नड शहरातील सर्व स्थरातील व्यापारी दुकानदार बांधवांनी आप आपली व्यापारी प्रतिष्ठाने , हाँटेल ,दुकाने बंद ठेवून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदविला .रायभान जाधव विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन जाधव ,इशा झा , यांनी आपल्या कार्यकर्त्यां सह कन्नड शहरातील प्रत्येक परिसरात फिरून आपली दुकाने बंद ठेवून कन्नड बंद मध्ये सहभागी होण्यांचे आवहान केले,यास व्यापारी मंडळींकडून चांगला प्रतिसाद मिळाला.या संदर्भात दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंद मध्ये सहभागी झालेल्या सर्व व्यापारी मंडळीचे आभार मानले.