कार्तिकी एकादशी निमित्ताने नायगाव येथे “भजनसंध्या” जागर हरिनामाचा या कार्यक्रमाचे आयोजन

नायगाव/नागेश कल्याण
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोना नामक महामारी च्या पर्शवभूमीवर काळजी घेत भव्य हरिकीर्तनाचे आयोजन न करता नागेश पाटील कल्याण, कल्याण परिवार व स्वरसंगम मित्रमंडळ नायगाव च्या वतीने “भजन संध्या” -“जागर हरिनामाचा” या कार्यक्रमाचे आयोजन जुन्या शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी, (हनुमान मंदिर )नायगाव येथे गुरूवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठिक 08.00 वा. करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमास पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध निवेदक तथा स्वरसंगम चे अध्यक्ष बाळासाहेब पांडे मांजरमकर, गायनाचार्य- प्रा. शंकर बिरादार, प्रा. माधव पा. किनाळकर, बालाजी चौधरी, त्रिंबक स्वामी नंदगावकर, महादय अप्पा, रमेश पा. जाधव खैरगावकर, ज्ञानेश्वर बैस, साईनाथ पा. जाधव, सुभाष पा. शिंपाळे, वसंत माने, पवन गादेवार,परिसरातील सुप्रसिध्द मृदंगवादक, नामदेव पांचाळ, विश्वेश्वर जोशी, तबला वादक हरिप्रसाद बाळासाहेब पांडे, बासरीवादक विजय द्रोणाचार्य,मनोज आरगुलवार ,हार्मोनियम वादक बालाजी जाधव, पांडुरंग माऊली, अशोक पा. चव्हाण, दिलीप पा. चव्हाण, अशोक पांचाळ, शंकर अप्पा बेळगे, सदाशिव मदेवाड, शिवराज स्वामी, सोमनाथ अप्पा, दुर्गादास महाराज, बालाजी पा. शिंदे पाळसगावकर, आदींसह नायगाव परिसरातील सर्वगुणी सुपरिचित-सुप्रसिद्ध कलावंत व निष्ठावंत वारकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
तरी या भजन संध्या जागर हरिनामाचा या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी सोशल डिस्टंसिंग पाळून लाभ घ्यावा असे आव्हान नागेश पाटील कल्याण, कल्याण पाटील परिवार व स्वरसंगम मित्र मंडळ नायगाव च्या वतीने करण्यात आले आहे.