Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी मतदान, औरंगाबाद जिल्ह्यात अंदाजे 80.70 टक्के मतदान…!

ताज्या घडामोडी साठी बघत राहा mh20live

औरंगाबाद:ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी मतदान, औरंगाबाद जिल्ह्यात अंदाजे 80.70 टक्के मतदान…!
औरंगाबाद, 15 जानेवारी गावाचा कारभारी निवडण्यासाठी आज मतदारांनी उत्साहात मतदान केले. सकाळी 7.30 वाजेपासून जिल्ह्यातील 579 ग्रामपंचायतसाठी शांततेत मतदान झाले. एकूण 617 ग्रामपंचायत मधून 35 ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाले. 610 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. 11499 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य पथके तैनात केले होते. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विना मास्क मतदारांना प्रवेश दिला जात नव्हता. सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यासाठी तैनात कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. मतदान करण्यासाठी सकाळी संथ गतीने मतदान सुरु होते. पण दुपारी बारा वाजेनंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढली. औरंगाबाद जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 80.70 टक्के मतदान झाले. सर्वात जास्त मतदान पैठण तालुक्यात 84.96 टक्के मतदान झाले. औरंगाबाद तालुक्यात 71 ग्रामपंचायतीसाठी 76.15, फुलंब्री 84.85, सिल्लोड 82.88, सोयगाव 81.24, कन्नड 79.50, गंगापूर 76.97 टक्के मतदान झाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close