Subscribe to our Newsletter
क्राईम

भोकरदन:विसवर्षीय तरुणीचा शेततळ्यात पाय घसरल्याने बुडून मृत्यू


(तालुक्यातील इब्राहिमपूर मधील घटना)

भोकरदन प्रतिनिधी/सुरेश गिराम

तालुक्यातील इब्राहिमपूर शिवारातील शेतात असलेल्या शेततळ्यावरून जात असतांना एक विसवर्षीय तरुणीचा तोल जाऊन पायघसरून शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता.४ रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक व राजपूत कृषी सेवा केंद्राचे संचालक महादूसिंग डोभाळ यांची पुतणी व यांचे भाऊ सिद्दुसिंग डोभाळ यांची मुलगी कु.पूजा सिद्दुसिंग डोभाळ २० ही महाविद्यालयीन तरुणी शेतात बंहिणींसोबत शेतातील शेततळ्यावर फिरत असतांना त्यातील कु.पूजा हीच शेतळ्यावरून जात असतांना अचानक तोल जाऊन ही शेततळ्यात पडली व सोबत असलेल्या बहिनींनी जोरजोरात आरडाओरडा केला मात्र शेतातील शेतगडी व आजूबाजूला असलेले नागरिकांनी धावाधाव केली असता तोपर्यंत पूजा ही शेततळ्यात बुडून खोलवर बुडाली होती दरम्यान भोकरदनचे मा.नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख व उद्योजक हुकूम सेठ चुंडवत यांना घटनेची माहिती मिळताच यांनी घटनास्थळी धावघेत तात्काळ संबंधित दलाच्या जवानां तात्काळ बचावकार्य चे आदेश दिले मात्र येथील नागरिक खाटेच्या साहाय्याने प्रयत्न करत होते जवळजवळ तास दिडतासानंतर सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर मार्ग घावला व खोलवर बुडालेली पूजा घाटेवर अडकली व त्या वेळी पूजा हिला वर काढून तात्काळ भोकरदन मधील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र येथील डॉक्टरांनी तपासणी करून पूजा हिला मृत घोषित केले होते या वेळी पूजा हिचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केले होते तर या वेळी बिट जमादार व पो.उपनि. बि.टी नागरगोजे पो.हे.कॉ.नागरगोजे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला होता व भोकरदन पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद सुरू होती
दरम्यान पूजा हिचे शवविच्छेदन झाल्यानंतर सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान तिच्यावर त्यांच्या राहत्या घरी इब्राहिमपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सदरील घटनेमुळे गावात मोठी शोककळा पसरली होती.
……………………….पूर्ण………………………..

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close