Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

श्रावण पाटील भिलवंडे एक राजकारणातील दिलखुलास व्यक्तिमत्व


नायगाव/नागेश कल्याण
भारतीय जनता पक्षाचे कार्यकुशल नेते श्रावण पाटील भिलवंडे हे नेहमीच कार्यकर्त्यांना उभारी देऊन त्यांच्यात चैतन्य निर्माण करून आपले पक्षीय कामकाज आपल्या दिलखुलासपणे आपल्या आगळ्यावेगळ्या सचोटीने पार पाडीत असतात. कार्यकर्त्यांसाठी पुर्ण वेळ देणारा नेता म्हणून आज नायगाव मतदार संघात त्यांची चांगली ख्याती आपल्या कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेऊन ते त्यांचा आदर युक्त सन्मान करण्याची कोणतीही संधी कधी ते सोडत नाहीत. त्याचे उदाहरणच द्याचे झाले तर नुकतीच नायगाव मतदारसंघातील शेळगाव (गौरी) येथील एक आदर्श कुशल शेतकरी व सक्रिय भाजप कार्यकर्ते विनायक पाटील शेळगावकर यांची भारतीय जनता पक्षातील किसान मोर्चाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याचे समजताच त्यांना आपल्या संपर्क कार्यालयात बोलावून त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करून त्यांना त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. सर्व कार्यकर्त्यांची राजकरणापलीकडे जाऊन नाते संबंध जोपासण्यात त्यांना जोड नाही. राजकारणा सोबतच सामाजिक कार्यात ही त्यांनी आपली एक आगळी वेगळी ओळख करून मतदारसंघात संघात एक आपली वेगळी छबी निर्माण केली आहे. त्यात आरोग्य शबीर, रक्तदान शिबीर, कोजागिरी उत्सव, कीर्तन सोहळे, वेगवेगळी धार्मिक, राष्ट्रीय, उत्सव, सामाजिक सलोखा राखून पक्षीय ध्येय धोरणाचे काटेकोर पालन करीत परीसरातील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेउन परिसरातील विद्यार्थी, युवक, शेतकरी, कामगार, नौकरदार वर्गाचे कोणतेही प्रश्न असोत त्यांसाठी ते कार्यतत्परतेने वेळ देऊन प्रश्नांची सोडवणूक करीत असतात परिसरातील रस्ते, वीज, पाणी, रोजगार यांसंबंधी प्रश्नही ते आपल्या सचोटीने प्रयत्न करतात यामुळे त्यांची एक आगळी वेगळी राजकीय छबी नायगाव मतदार संघातील राजकारणात निर्माण झाली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close