Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

नायगाव तालुक्यात शक्ती प्रदर्शन करीत ६८३ ग्रामपंचायत उमेदवाराचे अर्ज दाखल

नरसीफाटा / शेषेराव कंधारे 
        नायगाव तालुक्यातील ७१ गावातील ६८ ग्रामपंचायतिची निवडणूक प्रक्रियेसाठी २३ डिसेंबर पासून सुरू झाली असून पाचव्या  दिवसा पर्यंत एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाले नव्हते मात्र दि.२८ डिसेंबरला २५ ग्रामपंचायतील १८८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तर दि.२९ डिसेंबर रोजी ६१ गावातील पॅनल प्रमुखांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत ६८३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
       नायगाव तालुक्यातील ७१ गावातील ६८ ग्रामपंचायतिची निवडणूक प्रक्रियेसाठी २३ डिसेंबर पासून सुरू झाली असून नामनिर्देश भरण्याच्या पाचव्या दिवसा पर्यंत एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाले नव्हते मात्र दि.२८ डिसेंबर रोजी २५ ग्रामपंचायतील १८८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल कले तर दि.२९ डिसेंबर रोजी ६१ ग्रामपंचायती मधील ६८३ उमेदवाराने अर्ज दाखल करण्यात आले आहे .
यात बरबडा  ग्रामपंचायतील ३४ उमेदवार,औराळा ग्राम पंचायतील ६ उमेदवार,हुस्सा  ग्रामपंचायतील १३ उमेदवार,टाकळी त.मा. ग्रामपंचायतील ५ उमेदवार, मनुर त.ब. ३ उमेदवार, कुंटुर
ग्रामपंचायतील ७ उमेदवार , नरंगल ग्रामपंचायतील ११ उमेदवार, कुंचेली ग्रामपंचायतील ११ उमेदवार, कुष्णुर ग्रामपंचायतील १३ उमेदवार, बेटकबिलोली ग्रामपंचायतील १० उमेदवार, अंचोली ग्रामपंचायतील १३ उमेदवार, घुगराळा ग्रामपंचायतील १७ उमेदवार, मेळगाव ग्रामपंचायतील १३ उमेदवार, सावरखेड ग्रामपंचायतील १३ उमेदवार, दरेगाव ग्रामपंचायतील ७ उमेदवार, खैरगाव ग्रामपंचायतील १० उमेदवार, टाकळी (बु) ग्रामपंचायतील १३ उमेदवार, सांगवी ग्रामपंचायतील १४ उमेदवार, मुस्तापुर ग्रामपंचायतील ४ उमेदवार, रातोळी ग्रामपंचायतील १८ उमेदवार, पाटोदा त.ब. ग्रामपंचायतील २१ उमेदवार, सालेगाव ग्रामपंचायतील २२ उमेदवार, मेळगाव ग्रामपंचायतील १३ उमेदवार. ईकळीमोरे ग्रामपंचायतील १ उमेदवार पळसगाव/ टाकळगाव ग्रामपंचायतील ११ उमेदवार, अलुवडगाव ग्रामपंचायतील २८उमेदवार, मांडणी ग्रामपंचायतील १उमेदवार, नावंदी ग्रामपंचायतील ५ उमेदवार, काहाळा खु.ग्रामपंचायतील १५ उमेदवार, वंजरवाडी ग्रामपंचायतील ५ उमेदवार, कोठाळा ग्रामपंचायतील १ उमेदवार, कांडाळा ग्रामपंचायतील १ उमेदवार, कार्ला त.मा.महेगाव ग्रामपंचायतील १७ उमेदवार, खंडगाव ग्रामपंचायतील १ उमेदवार, वजिरगाव ग्रामपंचायतील २२ उमेदवार, माजरंम/ मांजरमवाडी ग्रामपंचायतील ७ उमेदवार, राजगड नगर ग्रामपंचायतील १६ उमेदवार, मोकासदरा ग्रामपंचायतील २० उमेदवार, बळेगाव ग्रामपंचायतील ७ उमेदवार, मुगाव/ मुगाववाडी ग्रामपंचायतील ५ उमेदवार, भोपाळा ग्रामपंचायतील १४ उमेदवार, घुगराळा ग्रामपंचायतील १७ उमेदवार, शेळगाव गौरी ग्रामपंचायतील १ उमेदवार, देगांव ग्रामपंचायतील ३ उमेदवार, सोमठाना ग्रामपंचायतील १७ उमेदवार, नरसी ग्रामपंचायतील ३७ उमेदवार, बेद्री ग्रामपंचायतील १२ उमेदवार, धानोरा त.मा.ग्रामपंचायतील १२ उमेदवार, रुई बु ग्रामपंचायतील ३८ उमेदवार, शेळगाव छत्री ग्रामपंचायतील १२ उमेदवार, गोदमगाव ग्रामपंचायतील १४ उमेदवार, कोकलेगाव ग्रामपंचायतील २५ उमेदवार, डोंगरगाव ग्रामपंचायतील ८ उमेदवार, ईकळी माळ ग्रामपंचायतील ८ उमेदवार, धुप्पा ग्रामपंचायतील १२ उमेदवार, हिप्परगा जा.ग्रामपंचायतील १० उमेदवार, कांडाळा बु.ग्रामपंचायतील १२ उमेदवार, गडगा ग्रामपंचायतील ६ उमेदवार असे एकूण ६८३ अर्ज प्राप्त झाले आहेत.
तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतची मुदत संपल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून. नामनिर्देशन पत्रे दाखल करणे आता दि. ३० डिसेंबर आजचा एक दिवस नामनिर्देशन सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत दाखल करता येणार आहेत.
तालुक्यातील अनेक सुशिक्षित तरुण वर्ग ग्रामीण भागात दाखल झाला आहे. लॉकडाऊन मुळे शहरी भागात असलेल्या अनेकांनी रोजगार गमावला आहे. रोजगार गमावून गावपातळीवर दाखल झालेले अनेक नवतरुण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हिरीरीने पुढे येत आहेत. त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अटीतटीच्या व चुरशीच्या होणार असल्याची चर्चा सोमवार व मंगळवारी गावागावातील पार्टी प्रमुखांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंचायत समितीच्या पटांगणात जत्रेचे स्वरूपावरुन सुरु होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close