सोन्नथंडी च्या संपत्ती देवगुंडे हा युवक किडनीच्या आजाराने त्रस्त* मुंबईच्या नायर हाँस्पीटल मध्ये उपचार सुरू* परिस्थिती बिकट असल्याने आर्थिक मदतीची गरज
माजलगाव दि.२५ ( प्रतिनिधी ):- तालुक्यातील सोन्नाथडी येथील संपत्ती नानाभाऊ देवगुंडे वय १९ वर्ष या युवकाला जन्मापासूनच आजारी होता अन आतातर दोन्ही किडनी निकामी झाल्याने हा युवक त्रस्त आहे या तरुणावर जानेवारी २०२२ पासून मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत घरची परिस्थिती बिकट असल्याने या तरुणाला आर्थिक मदतीची गरज आहे समाजातील दानशूर व्यक्तींनी या तरुणाला आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. सोन्नाथडी येथील नानाभाऊ देवगुंडे हे दाम्पत्या शेतमजूर असुन यांना गणेश, संपत्ती ही दोन मुले,आणि एक मुलगी अशी तीन अपत्य आहेत मुलीचे लग्न झाले आहे .गणेश हा मोठा मुलगा संसारात मदत करतोय आणि छोटा संपत्ती वय १९ वर्षे हा वयाच्या १ वर्षा पासून आजारी आहे.या शेतमजूरी करणाऱ्या कुंटुबाने तब्बल १८ वर्षे त्यांच्या दवाखाना करीत आहेत.अधिक त्रास होत असल्याने त्याला जानेवारी २०२२ ला मुंबई येथील नायर हाँस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असता संपत्ती देवगुंडे या तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असल्याचे डॉक्टरानी सांगितले आहे. लाखो रूपयेचा खर्च आता हे कुंटब करू शकत नाही संपत्ती ला आता एका दिवसा आड डायलिसिस करावे लागत आहे. आणि किडणी बदलावी लागणार आहे हे कुटुंब आता खुप मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.या तरूणाच्या पुढील उपचारासाठी समाजातील गरजु दानशुर व्यक्ती नी महाराष्ट्र ग्रामीण बँक IFC .mAHG0004515Ac n. 54515018355 येथे मदत करावी .