Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

अंबड तालुक्यात झालेल्या ठिबकसिंचनची चौकशी करा :रामेश्वर खरात

अंबड/प्रतिनिधी :- तालुक्यात झालेल्या ठिबकसिंचनची सखोल चौकशी करावी यासंदर्भातची मागणी युवा मल्हार सेनेचे रामेश्वर खरात यांनी जिल्हाकृषी अधीक्षक यांना पत्राद्वारे केली आहे.

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे देशाची अर्थव्यवस्था कृषी व्यापारावर अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी सुधारला पाहिजे शेतीची उन्नती झाली पाहिजे या विचाराने कुठल्याही पक्षाचा सरकार आ येवो परंतु शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी सतत नवनवीन योजना आणून देश सुखी व समृद्ध करण्याचा विचार सरकारच्या घे धोरणांमध्ये असतो परंतु केंद्र सरकारने राज्य सरकारने घोषित केलेले योजना खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का पोहोचल्या तरी त्या योजनांचा प्रवास शेतकऱ्यांना किती खडतर होतो प्रत्येक विभागातील कर्मचारी अधिकारी शेतकऱ्यांची किती प्रमाणात पिळवणूक करतात हे आपणा सर्वांना माहीत आहेअंबड तालुक्यात मागील पाच वर्षांपासून ठिबकसिंचन मध्ये फार मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे एखाद्या शेतकऱ्याने एक एकर ठिबक केले व त्याचा सातबारा एकर पेक्षा जास्त असेल तर बाकी जमिनीवर शेतकऱ्याला न सांगता सबसिडी काढण्यात आलेली आहे तर काही प्रकरणात सातबारा एकाच्या नावाचा व जिओ टॅगिंग दुसऱ्याच्या च शेतात तसेच ठिबकची नळी फिल्टर वाल पीव्हीसी पाईप व ईतर मटेरियल आय एस आय नामांकित कंपनीची न वापरता नॉन आय एस आय वापरण्यात आली आहे असे अनेक प्रकार अंबड तालुक्यात घडले आहे याचसंदर्भात चौकशी करावी व जो अधिकारी किंवा कर्मचारी यास जबाबदार आहे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी युवा मल्हार सेनेचे रामेश्वर खरात यांनी केली आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close