Subscribe to our Newsletter
Loading
II जागो ग्राहक जागो ll

वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा: संजय सोनवणे

सिल्लोड तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

सिल्लोड/विशाल जाधव

-दि 24 गुरुवार रोजी तहसील कार्यालय सिल्लोड येथील तलाठी भवन येथे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. 24 डिसेंबर 1986 रोजी राष्ट्रपतींनी ग्राहक संरक्षण कायद्यावर स्वाक्षरी केली त्यामुळे 24 डिसेंबर हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्ताने नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी ग्राहकांचे हक्क व कर्तव्य विविध योजना व इ पॉस मशीन याविषयी माहिती देत एक नागरिक म्हणून, राज्यघटनेने आपल्याला नागरिकत्वाचे हक्क दिले तसेच, ग्राहक म्हणूनही आपल्याला काही अधिकार देण्यात आले आहेत. त्यातील पहिला आणि सर्वात मोठा हक्क म्हणजे ग्राहकांना दिलेल्या किंमतीच्या समान वस्तू त्यांना मिळाली पाहिजे. वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊनच हा कायदा बनवला गेला आहे.केंद्र सरकारने यावर्षी जुलैमध्ये ग्राहक संरक्षण कायदा 2019अंतर्गत नवीन ई-कॉमर्स नियम लागू केले आहेत. वास्तविक, ऑनलाईन शॉपिंगच्या ट्रेंडमुळे हे बदल केले गेले आहेत. ऑनलाईन खरेदी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूकीच्या तक्रारी समोर येत आहेत. हे नवीन नियम अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या ई-कॉमर्स साईटवरही लागू होतील. त्यात ई-कॉमर्स साईटसाठी अनेक कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. नवीन नियमांनुसार बनावट व भेसळयुक्त वस्तू विकणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते अशी माहिती देत ग्राहक संरक्षण कायद्याच्या अनुषंगिक बाबी समजावून सांगितला. यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सोहेल कादरी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती स्वाती म्हळसणे,आशिष औटी, ज्ञानेश्वर बनकर,पुरवठा विभागाचा सर्व कर्मचारी वृंद,,नजीरखा पठाण,राजेंद्र शेजुळ,अब्दुल वाहेद,जाधव सर,आनंदा दांडगे,यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पंचक्रोशीतील नागरिक ग्राहक यांनी उपस्थिती लावली.यावेळी ग्राहकांचा प्रातिनिधिक स्वरूपात गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close