Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

वोखार्ट ग्लोबल स्कूलमध्ये व्हर्चुलपद्धती द्वारे आंतरशालेय “कॅलिडोस्कोप– टॅलेंट

अंबाउन्ड २०२०” स्पर्धा आणि शाळेचा ३ रा वार्षिक सांस्कृतिक समारोह दि. १८ डिसेंबर २०२० रोजी साजरा

औरंगाबाद – वोखार्ट ग्लोबल स्कूलमध्ये व्हर्चुलपद्धती द्वारे आंतरशालेय “कॅलिडोस्कोप– टॅलेंट अंबाउन्ड २०२०” स्पर्धा आणि शाळेचा ३ रा वार्षिक सांस्कृतिक समारोह दि. १८ डिसेंबर २०२० रोजी साजरा करण्यात आला. फेसबुक तसेच इतर डिजिटल माध्यमांद्वारे याचे थेट प्रक्षेपण दुपारी १२ वाजल्या पासून सुरू होते.
५० हून अधिक शाळेतील १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी खालील विविध श्रेणीमध्ये सहभाग घेतला होता.
इयत्ता ५ वी :- “सेलिब्रेटींग इंडियावर आधारित” – नृत्य स्पर्धा
इयत्ता ६ वी आणि ७ वी :– “मॉडेल मेकिंग”- “हँड हेड अँड हार्ट”, तसेच “आत्मनिर्भर भारत” किंवा “सर्व शिक्षा अभियान” या विषयांवर हिंदीमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
इयत्ता ८ वी आणि ९ वी :- “ ध्वनी ”- गायन तसेच वाद्य स्पर्धा आणि “शिक्षणाचा बदलता चेहरा” या विषयावर इंग्रजीमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
इयत्ता १० वी :– वाद-विवाद स्पर्धा – “ऑनलाईन शिक्षण आणि भारताचे भवितव्य- चांगले की वाईट?” आणि तसेच चित्रकला स्पर्धा विषय –“कॅनव्हास अलाईव”! वरती घेण्यात आली.
क्रीडा स्पर्धेमध्ये “योगा प्रदर्शन,स्केटिंग,जिम्नॅस्टिक आणि मार्शल आर्ट” या कौशल्यावरील खेळाचा समावेश होता. वेगवान पद्धतीने रुबिक सोडवणे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
वरील श्रेणीतील विजेते पुढीलप्रमाणेः१. सुखदा जोशी २.मोहम्मद हसनेन३. आर्या वाघमारे
४. आर्या लोया ५.श्रेया मुंदडा ६.अनुष्का जगताप ७.सेजल पाटील ८. ॐकार पाखे
९. श्रेया जैस्वाल
गेल्या शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
प्राचार्या श्रीमती उमा मोहनदास यांनी कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या उत्कृष्ट समन्वय आणि संघ कार्याबद्दल कौतुक केले आणि स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close