Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड खुलताबाद पोलिसांची कारवाई

औरंगाबादःखुलताबाद तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोर्‍यांचे सत्र वाढले होते. विरमगाव, बाजार सावंगी, वडगाव, अशा विविध ठिकाणाहून या अट्टल दुचाकी चोरांनी आठ दुचाकी लंबावल्या होत्या. बाजार सावंगी येथील एक दुकान फोडून एलईडी टीव्ही लंपास करण्यात ते यशस्वी झाले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. बोडखा गावाकडून झरी कडे दुचाकीवरून येणार्‍या चोरट्यांना शिताफीने पकडुन अटक केली. त्यांच्या ताब्यातून चार दुचाकीसह , पाच एलईडी टीव्ही शेगडी , साडया असा एकुण 2 लाख 850 हजाराचा
मुद्देमाल केला जप्त. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.20 सप्टेंबर रोजी बाजारसावंगी येथील आजीनाथ हारीभाऊ काटकर यांची होंडा शाईन गाडी तर दि.14 ऑक्टोंबर 2020 रोजी बाजार सावंगी येथूनच सुरेश राजाराम परमार यांची होंडा ड्रीमयुगा या गाड्या चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. रामेश्वर तेजराव भागवत रा.शिरोडी यांचे बाजारसावंगी येथील इलेक्ट्रीक दुकानाचे शटर उचकटुन या चोरटयाने एलईडी टिव्ही , फॅन , शेगडी चोरुन नेले होते. तर दि.27 ऑक्टोंबर 2020 रोजी धामणगाव चे पोलीस पाटील पंडीत माचवे व जावेद शेख यांची होंडा शाईन दुचाकी चोरली होती. तर आजीनाथ खंडागळे यांचे कपडयाचे दुकानाचा पत्रा उचकटुन साडया,होजीअरी मटेरीअल चोरी केली होती. अशा प्रकारे आठ चोरीच्या तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. मागील काही दिवसापासुन सतत एकाच परिसरात अशाप्रकारचे गुन्हे घडत असल्याने पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांनी स्वत : गुन्ह्यांना आळा बसविण्याचे उद्देशाने चोरट्यांना पकडण्याची योजना आखली . त्याबाबत आराखडा तयार करुन पोलीस स्टेशन हद्दीतीत पोलीस पाटील गणेश राऊत, पंडित माचवे यांच्यासह , पोलीस मित्र , ग्राम संरक्षण दलाचे सदस्य यांच्या मदतीने संशयीत इसमांची माहीती घेऊन तपासाची चक्र फिरवली होती.शनिवार दि. 19 रोजी पोलिसांनी झरी – वडगाव रोडवर सापळा व लावला होता. दुचाकी चोर शेषराव ऊर्फ शश्या ऊर्फ सचिन सुभाष सोनवणे व प्रविण ऊर्फ पिन्टु दुर्योधन सोनवणे वय 29 वर्ष यांना चोरीच्या साहित्यासह पकडले.् पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी विविध ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकिस येण्याची दाट शक्यता आहे. चोरट्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील , सहाय्यक पोलीस अधिक्षक गोरख भामरे , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे , पोउपनि भगवान झरेकर , पोउपनि जगदीश मोरे , पो.हे. संजय जगताप , नवनाथ कोल्हे , पो.ना.विनोद बिघोत , योगेश नाडे , यतीन कुलकर्णी , पो.कॉ. प्रकाश ठोकळ , किशोर महेर , योगेश तरमाळे , जीवन घोलप संतोष पुंड व पोलीस पाटील गणेश राऊत यांनी केली विशेष परिश्रम घेतले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close